Flipkart Grand Gadget Days Sale: 'या' गॅजेट्सवर मिळत आहे जबरदस्त सूट!
फ्लिपकार्ट I प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Official)

ई कॉमर्स वेबसाईट Flipkart ने आजपासून Grand Gadget Days या सेलची सुरुवात केली आहे. हा सेल Flipkart वर 27-29 नोव्हेंबर दरम्यान चालेल. या सेलअंतर्गत लॅपटॉप आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सवर 80% पर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. या सेलमध्ये HDFC बँक कार्ड होल्डर्सला 5% पर्यंत इंस्टेंट डिस्काऊंट देखील दिले जात आहे. त्याशिवाय नो कॉस्ट इएमआयचा पर्यायही मिळत आहे. तर पाहुया या सेलअंतर्गत कोणत्या वस्तूंवर किती डिस्काऊंट मिळत आहे...

लॅपटॉपवर 7,500 रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट

Flipkart Grand Gadget Days सेलमध्ये अनेक ब्रँडच्या निवडक लॅपटॉप्सवर 7,500 रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट मिळत आहे. याशिवाय 30,000 रुपयांपर्यंतची डिस्काऊंट ऑफर देखील उपलब्ध आहे. या सेलअंतर्गत तुम्हाला 14,990 रुपयांपासून लॅपटॉप उपलब्ध असतील. गेमिंग लॅपटॉपवर 40,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट ऑफर दिली जात आहे. गेमिंग लॅपटॉप 52,990 रुपयांपासून उपलब्ध आहे.

प्रिंटरवर देखील मिळत आहे डिस्काऊंट

या सेलअंतर्गत HP, Canon, Epson यांसारख्या ब्रँडच्या लॅपटॉपवर 53% डिस्काऊंट मिळत आहे. 2,499 रुपयांपासून हे लॅपटॉप उपलब्ध आहेत. यासोबत तुम्हाला नो कॉस्ट इएमआय चा पर्याय देखील उपलब्ध आहे.

DSLR कॅमेऱ्यावर 50,000 रुपयांचे डिस्काऊंट

या सेलमध्ये तुम्ही अनेक ब्रँड्सच्या प्रोफेशनल DSLR कॅमेऱ्यावर 50,000 रुपयांचे डिस्काऊंट मिळत आहे. DSLR कॅमेरे 53,990 रुपयांपासून उपलब्ध होतील. यात तुम्हाला नो कॉस्ट इएमआय चा पर्याय देखील उपलब्ध असेल.

या प्रॉडक्ट्सवर देखील मिळत आहे डिस्काऊंट

स्मार्टफोन कव्हर्स 199 रुपयांत उपलब्ध आहेत. तर ट्रिमर्स तुम्ही 299 रुपयांत खरेदी करु शकता. लॅपटॉप बॅग्स 249 तर पावरबँक 499 रुपयांपासून उपलब्ध आहेत. ब्लूटुथ स्पीकर्सवर 60% डिस्काऊंट देण्यात येत आहे. माऊस, किबोर्ड यांसारख्या कंम्प्युटर अॅक्सेसरीज 199 रुपयांपासून उपलब्ध आहे. या सेलमध्ये तुम्ही टॅब्स 6,999 रुपयांना खरेदी करु शकता.