IPL Auction 2025 Live

Flipkart Flight Booking: फ्लिपकार्टने सुरु केली विमान तिकीट बुकिंग सेवा; डोमेस्टिक व आंतरराराष्ट्रीय फ्लाईट्ससाठी मिळत आहे भरघोस सुट, See Offers

आता अजून एक पाऊल पुढे जाऊन फ्लिपकार्टने विमान प्रवाश्यांसाठी नवीन ऑफर आणली आहे.

Flipkart (Photo Credits: File Photo)

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने (Flipkart) भारतामध्ये Amazonला टक्कर देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या होत्या. आता अजून एक पाऊल पुढे जाऊन फ्लिपकार्टने विमान प्रवाश्यांसाठी नवीन ऑफर आणली आहे. ऑनलाइन वस्तू विक्रेता कंपनी फ्लिपकार्टने आता विमान तिकिटांचे बुकिंग (Flight Ticket Booking) सुरू केले आहे. कंपनीचे फ्लाइट बुकिंग पोर्टल लाइव्ह झाले आहे. फ्लिपकार्टवर फ्लाइट तिकीट बुकिंगसाठी अनेक ऑफर्स आहेत. फ्लिपकार्ट फ्लाइट सर्व्हिसमध्ये वापरकर्ते देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही विमानांसाठी बुकिंग करू शकतात. स्वस्त फ्लाइट तिकीट देण्याच्या उद्देशाने हे पोर्टल सुरू करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे.

फ्लिपकार्ट पोर्टलवरून विमानाचे बुकिंग करताना कंपनी अनेक ऑफर देत आहे. पहिल्यांदाच, या पोर्टलद्वारे तिकिट बुक करणारे ग्राहक FKNEW10 कूपन वापरुन तिकिट दरावर 10% सूट मिळवू शकतात. FKDOM कूपन कोडसह देशांतर्गत विमानांवर 2,500 रुपयांची सूट असेल. याशिवाय फ्लिपकार्टच्या राऊंड ट्रिप बुकिंगवर RNDTRIP कोड वापरुन तुम्ही 600 रुपये सवलतीचा लाभ घेऊ शकला. त्याचबरोबर FLYTWO कूपन कोड वापरुन 750 रुपयांची सूट मिळू शकते.

फ्लिपकार्टचे रेग्युलर यूजर्स तिकीट बुकिंगमध्ये आपल्या SuperCoins चा वापर करू शकतील. आपण तिकीट बुकिंगच्या वेळी SuperCoins रिडीम करू शकता. जर वापरकर्त्याकडे फ्लिपकार्ट SuperCoins संख्या जास्त असेल तर ते विनामूल्य प्रवास करू शकतील. फ्लिपकार्टवर खरेदी केल्यानंतर आपणास SuperCoins प्राप्त होतात. दरम्यान, कोरोना व्हायरस (Coron avirus) आणि चालू असलेल्या लॉकडाउनमुळे वेबसाइटवर एक लिंक देखील दिली गेली आहे, जी आपल्या राज्यात प्रवास करण्यासाठी कोणने नियम लागू आहेत ते वापरकर्त्यांना सांगेल. या लिंकवर 'सुरक्षित प्रवासाची मार्गदर्शक तत्वे', रद्दबातल धोरण, प्रवासादरम्यान कोरोना व्हायरसच्या विरूद्ध संरक्षक तत्वे आणि इतर बर्‍याच गोष्टी दिल्या गेल्या आहेत.