Flipkart Electronics Sale 2022: फ्लिपकार्टवर सेल सुरू! स्वस्तात खरेदी करू शकता Smartphones, TVआणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू; जाणून घ्या डिस्काउंट ऑफर

ज्यामध्ये बँक डिस्काउंट तसेच एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट EMI उपलब्ध आहेत.

Flipkart (PC - Twitter)

Flipkart Electronics Sale 2022: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक्स सेल (Flipkart Electronics Sale) सुरू आहे. तुम्ही नवीन स्मार्टफोन, टीव्ही किंवा एअर कंडिशनर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्टवरील हा सेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या सेलमध्ये तुम्ही स्वस्त किमतीत इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू शकता. 27 मार्चपासून सुरू झालेला हा सेल 31 मार्चपर्यंत चालेल. ज्यामध्ये बँक डिस्काउंट तसेच एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट EMI उपलब्ध आहेत. या सेलमध्ये ग्राहकांना फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड प्रोग्रामचाही लाभ मिळणार आहे. या सेलमध्ये कोणत्या ऑफर्स आहेत यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर 70% पर्यंत सूट -

फ्लिपकार्ट सेलमध्ये मोबाईलसह, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवरही ऑफर उपलब्ध आहेत. तुम्ही 70% पर्यंत सूट मिळवून अनेक वस्तू खरेदी करू शकता. ग्राहकांना सिटी बँकेच्या कार्डवर 10% सूट मिळत आहे. या सेलमध्ये तुम्ही Redmi Note 10s, Vivo T1 5G, Samsung Galaxy F23 5G सह अनेक फोन स्वस्तात खरेदी करू शकता. (हेही वाचा - 'या' दिवशी सुरू होणार Airtel 5G सेवा; वापरकर्त्यांना मिळणार High-Speed Internet ची सुविधा; जाणून घ्या सविस्तर)

स्वस्तात खरेदी करू शकता स्मार्टफोन -

या सेलमध्ये 5G सपोर्ट असलेल्या लेटेस्ट फोनवरही ऑफर उपलब्ध आहेत. फ्लिपकार्ट सेलमध्ये, तुम्ही अलीकडेचं लॉन्च केलेल्या Realme 9 5G, Realme 9 Pro, Realme 9 Pro Plus 5G सह अनेक हँडसेटवर सवलतींचा लाभ घेऊ शकता. एचडीएफसी बँकेच्या कार्डांवर यावर 1000 ची सूट उपलब्ध आहे. तुम्ही स्वस्त 5G फोन शोधत असाल, तर तुम्ही POCO M3 Pro 5G खरेदी करू शकता.

TV वर मिळेल खास ऑफर -

तुम्ही नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या इलेक्ट्रोनिक सेलमध्ये Infinix X3 टीव्ही 11,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. यावर, सिटी बँकेच्या कार्डवर 1500 रुपयांपर्यंत सूट मिळते. 32-इंच स्क्रीन आकाराचा हा टीव्ही Android ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. यामध्ये यूजर्संना Netflix, Prime Video, YouTube, Disney Plus Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळते. यात 60Hz चा रिफ्रेश दर आणि 20W च्या ध्वनी आउटपुटसह स्क्रीन आहे.