Flipkart Big Savings Day 2020 ला 6 ऑगस्ट पासून सुरुवात; जाणून घ्या आकर्षक ऑफर्स आणि डिस्काऊंट्स

फ्लिपकार्टवर Flipkat Big Saving Days 2020 ला 6 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या सेल अंतर्गत ग्राहकांना मोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन यावर भरगोस सूट मिळत आहे. 6-10 ऑगस्ट दरम्यान या सेलचा लाभ ग्राहक घेऊ शकतात.

Flipkart Big Savings Day 2020 (Photo Credits: Flipkart Official Site)

फ्लिपकार्टवर Flipkat Big Saving Days 2020 ला 6 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या सेल अंतर्गत ग्राहकांना मोबाईल्स (Mobiles), इलेक्ट्रॉनिक्स (Electronics), फॅशन प्रॉडक्ट्स (Fashion Products) यावर भरगोस सूट मिळत आहे. 6-10 ऑगस्ट दरम्यान या सेलचा लाभ ग्राहक घेऊ शकतात. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्संसाठी हा सेल 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 8 वाजताच सुरु केला जाईल. या सेलअंतर्गत सिटी बँक (Citi Bank) क्रेडिट व डेबिट कार्ड्स, आयसीआयसीआय (ICICI) कार्ड्स यावरुन खरेदी केल्यास 10% चा डिस्काऊंट मिळेल. या सेलमध्ये प्रत्येक 6 तासानंतर ब्लॉक बस्टर डिल्स मिळतील. त्यात मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप इत्यादींवर शानदार ऑफर्स दिल्या जातील. विशेष म्हणजे 2-4 ऑगस्ट दरम्यान आपल्या आवडीचे प्रॉडक्ट्स केवळ 30 रुपयांत प्री-बुक करता येतील. तसंच हे सर्व प्रॉडक्ट्स सेल अंतर्गत अगदी स्वस्तात मिळतील अशी माहिती फ्लिपकार्टकडून देण्यात आली आहे.

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स कॅटगरीमध्ये प्रॉडक्ट्स 50% ची सूट दिली जात आहे. त्याचबरोबर नो कॉस्ट ईएमआयची ऑफर मिळत आहे. मोबाईल फोन्सवर 30-40% ची सूट आणि एक्सचेंज ऑफर मिळत आहे. टीव्ही आणि होम अप्लायन्सेस वर 50% ची सवलत दिली जात आहे. लॅपटॉपवर 35-50% सूट मिळण्याची संधी या सेलमध्ये युजर्संना मिळत आहे. तसंच फॅशनच्या टॉप ब्रँड्सवर 80% ची सूट मिळत आहे.

फ्लिपकार्टच्या या सेल अंतर्गत बेस्ट सेलर स्मार्टफोन्स सर्वात कमी किंमतीत उपलब्ध होत आहेत. रेडमी नोट 7 प्रो, ऑनर 10 लाईट, सॅमसंग गॅलेक्सी सिरीज, अॅपल आयफोन्स, असुस मॅक्स प्रो आणि शाओमी रेडमी 7 सिरीजवर बंपर ऑफर्स मिळत आहेत. तसंच फोन्सवर एक्सचेंज ऑफर, नो-कॉस्ट ईएमआय आणि बायबँक गॅरंटी देखील मिळेल.

या सेल अंतर्गत रियलमी एक्स 2 प्रो च्या 8 जीबी रॅम आणि 28 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 28,999 रुपये, ऑनर 9एस ची किंमत 5,999 रुपये, iQOO3 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 31,990 रुपये, ओप्पो रेनो 2एफ च्या 6 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,990 रुपये इतकी आहे. ओप्पो एफ11 प्रो च्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,990 रुपये इतकी आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now