Flipkart Big Diwali Sale 2021: iPhone 12, Google Pixel 4a यांसह अनेक स्मार्टफोन्स आकर्षक डिस्काऊंट मिळण्याची आज अखेरची संधी

या सेलमध्ये स्मार्टफोन्स, ईअरबर्ड्स आणि वेगवेगळ्या उपकरणांवर भरगोस डिल्स उपलब्ध होत्या.

Flipkart Big Diwali Sale 2021 (Photo Credits: Flipkart)

फ्लिपकार्ट बिग दिवाली सेल 2021 (Flipkart Big Diwali Sale 2021) ला मागील आठवड्यापासून सुरुवात झाली असून आज या सेलचा शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, ईअरबर्ड्स आणि वेगवेगळ्या उपकरणांवर भरगोस डिल्स उपलब्ध होत्या. तसंच या सेल दरम्यान  फ्लिपकार्टने एसबीआय (SBI) सोबत पार्टनरशीप करुन एसबीआयच्या ग्राहकांना 10 टक्के डिस्काऊंटची ऑफर दिली होती. दिवाळीसाठी नवा स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर फ्लिपकार्टच्या आकर्षक डिस्काऊंट ऑफरमध्ये तुम्ही हे फोन्स विकत घेऊ शकतात. (Dhanteras Offers 2021: धनतेरस निमित्त Flipkart आणि Amazon वर Gold - Silver Coin पासून TV, Smartphones खरेदीसाठी या आहेत धमाकेदार ऑफर्स)

आयफोन 12 आणि आयफोन 12 मिनी:

आयफोन 12 फ्लिपकार्टवर सेल दरम्यान आकर्षक डिस्काऊंटमध्ये उपलब्ध आहे. आयफोन 12 चा 64 जीबी मॉडल 42,099 रुपयांना मिळू शकतो. तर 120 जीबी मॉडलसाठी 48,249 आणि 256 मॉडलसाठी 58,249 रुपये मोजावे लागतील. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. तसंच एक्सजेंच ऑफर अंतर्गत तुम्हाला 15,000 रुपयांचा डिस्काऊंट देखील मिळेल.

Flipkart Big Diwali Sale 2021 (Photo Credits: Flipkart)

Google Pixel 4a:

Google Pixel 4a  हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट वर 45,999 रुपयांना उपलब्ध आहे. तसंच डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 2000 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल. पिक्सल बर्ड्स ए सिरीज 6,999 रुपयांना उपलब्ध आहे. गुगल पिक्सल 4a मध्ये 5.81 इंचाचा डिस्प्ले दिला असून 3140mAh ची बॅटरी देखील दिली आहे.

Flipkart Big Diwali Sale 2021 (Photo Credits: Flipkart)

Oppo Reno6 Pro 5G Majestic Gold:

Oppo Reno6 Pro 5G या स्मार्टफोनचा Majestic Gold मॉडल 41,999 रुपयांना फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. खरेदी करताना क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केल्यास 4000 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. तसंच हा स्मार्टफोन खरेदी करताना एक्सचेंज ऑफरचा पर्याय निवडल्यास तुम्हाला 19000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळू शकतो.

Flipkart Big Diwali Sale 2021 (Photo Credits: Flipkart)

Samsung Galaxy F42 5G:

Samsung Galaxy F42 5G या स्मार्टफोनचा 6 जीबी+120 जीबी वेरिएंट 17,999 रुपयांना तर 8 जीबी+128 जीबी वेरिएंट 19,999 रुपयांना उपलब्ध असेल. तर क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना 1500 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळू शकतो. तसेच एक्सचेंज ऑफर अंतर्गत या स्मार्टफोनवर तुम्हाला 14,950 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो.

Flipkart Big Diwali Sale 2021 (Photo Credits: Flipkart)

या सर्व मोबाईल फोन्स सोबतच मोटरोला ई-40, पोको सी 31, रियलमी 8 आय, रियलमी 8 एस 5जी, आयफोन एसी, आयफोन नार्झो 50 आय या आणि अशा अनेक स्मार्टफोन्सवर तुम्हाला डिस्काऊंट मिळू शकतो.