फ्लिपकार्ट कडून Walmart India ची खरेदी; ऑगस्टमध्ये सुरु होणार Flipkart Wholesale नवे डिजिटल मार्केट
ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट ग्रुपने वॉलमार्ट इंडिया चे 100% शेअर्स विकत घेतले आणि फ्लिपकार्ट होलसेल या नावाने नवीन डिजिटल मार्केट सुरु केले आहे. फ्लिपकार्ट होलसेलचे कामकाज ऑगस्टपासून सुरु होईल.
ई-कॉमर्स (E-Commerce) वेबसाईट फ्लिपकार्ट ग्रुपने (Flipkart Group) वॉलमार्ट इंडिया (Walmart India) चे 100% शेअर्स विकत घेतले असून फ्लिपकार्ट होलसेल (Flipkart Wholesale) या नावाने नवीन डिजिटल मार्केट सुरु केले आहे. फ्लिपकार्ट होलसेलचे कामकाज ऑगस्टपासून सुरु होईल. सुरुवातीला केवळ धान्य आणि फॅशन सेगमेंट या दोनच सुविधा सुरु करण्यात येतील. फ्लिपकार्ट होलसेलचा या नवीन व्यवसायाची जबाबदारी फ्लिपकार्टचे आदर्श मेनन (Adarsh Menon) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. फ्लिपकार्ट होलसेलचे कामकाज सुरळीतरित्या पार पडण्यासाठी वॉलमार्ट इंडियाचे सध्याचे सीईओ समीर अग्रवाल हे कंपनीसोबत असतील.
सध्या फ्लिपकार्टवर किराणा माल, धान्य या वस्तू मिळत नाहीत त्यामुळे या नवीन व्यवसायाद्वारे फ्लिपकार्ट किराणा माल आणि धान्य या सेगमेंटमध्ये मोठे पाऊल उचलत आहे. वॉलमार्ट इंडियाचे सध्या भारतात 28 स्टोअर्स असून 2 Fulfilment Centres आहेत. वॉलमार्ट इंडियामध्ये सध्या 3500 कर्मचारी काम करत असून आता हे सर्व कर्मचारी फ्लिपकार्ट ग्रुपच्या अंतर्गत काम करतील.
फ्लिपकार्टच्या या नवीन होलेसेल ऑनलाईन बिजनेसमध्ये छोट्या दुकानदारांना किराणा मालाचे सामान होलसेल दरात ऑनलाईन ऑर्डर करता येईल. वॉलमार्ट बेस्ट प्राईज सध्या किराणा माल आणि इतर MSME सह 15 लाखाहून अधिक सदस्यांना पाठिंबा देत आहे. फ्लिपकार्ट ग्रुपचे सीईओ कल्याण कृष्णमुर्ती यांनी असे म्हटले की, "फ्लिपकार्ट होलसेलच्या लॉन्चमुळे देशभरातील छोट्या व्यापाऱ्यांना टेक्नॉलॉजी, लॉजिस्टीक आणि आर्थिक मदत करण्यास फ्लिपकार्ट अधिक सक्षम होईल. वॉलमार्ट इंडियाच्या अनुभव आणि कौशल्यामुळे किराणा व्यवसाय आणि MESE च्या गरजा पूर्ण करण्यास मदत होईल."
फ्लिपकार्टचे आदर्श मेनन यांनी सांगितले की, "फ्लिपकार्ट होलसेल मधून तब्बल 650 बिलियन डॉलरचा व्यवसाय होण्याचा अंदाज आहे. सुरुवातील या 650 बिलियन डॉलरपैकी 140 बिलियन डॉलरला टार्गेट करत फॅशन, धान्य, छोटे-मोठे इलेक्ट्रॉनिक्स यांचा व्यवसाय सुरु करण्यात येतील."
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)