SpO2 ट्रॅकर आणि 1.3 इंचाचा HD डिस्प्ले भारतात लॉन्च सर्वाधिक स्वत Smartwatch, जाणुन घ्या किंमत
स्मार्टवॉचची एक सीरिज लॉन्च केल्यानंतर फायर बोल्टने आता Fire Boltt Ninja चे लॉन्चिंग केले आहे. याची किंमत 2 हजार रुपयांहून कमी आहे.
Fire Boltt ने भारतात आपले आतापर्यंतचे सर्वाधिक स्वस्त स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. स्मार्टवॉचची एक सीरिज लॉन्च केल्यानंतर फायर बोल्टने आता Fire Boltt Ninja चे लॉन्चिंग केले आहे. याची किंमत 2 हजार रुपयांहून कमी आहे. फायर बोल्ट निंजा स्मार्टवॉचमध्ये एक मोठा डिस्प्ले, फुल मेटल बॉडी, SpO2 ट्रॅकर, हेल्थ ट्रॅकर, टच-टू-वेक सारखे फिचर ही दिले जाणार आहेत. कंपीने यापूर्वी Fire Boltt Beast, Talk Agni स्मार्टवॉच भारतात लॉन्च केले होते.
Fire Boltt Ninja भारतात 1799 रुपयांना लॉन्च केले आहे. स्मार्टवॉच खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्टवर ते उपलब्ध आहे. हे स्मार्टवॉच ब्लॅक, सिल्वर आणि पीचसह तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. 1799 रुपयांत फायर बोल्ट निंजा सर्वाधिक स्वत स्मार्टवॉच आहे. हे वॉच 2 हजार रुपयांपेक्षा कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी लॉन्च केले आहे.(Ola Electric Scooter: बहुप्रतिक्षित ओला इलेक्ट्रिक स्कूटर अखेर 'या' दिवशी येणार बाजारात, ओला कॅब्सचे संस्थापक भावीश कुमारांनी ट्विट करत दिली माहिती)
फायर बोल्ट निंजा 1.3 इंचाचा एचडी डिस्प्लेसह स्पोर्ट्स मोड मध्ये रनिंग, वॉकिंग, साइकलिंग, बास्केटबॉल, बॅडमिंटन आणि फुटबॉल सारखे मोड येणार आहे. त्यामुळे आपल्या गरजेनुसार त्याचा वापर करता येणार आहे. स्मार्टवॉच आरोग्यासंबंधित मॉनिटर लैस आहे. जसे ऑक्सिजन स्तरला ट्रॅक करण्यासाठी SPO सेंसर, 24X7 ऑप्टिकल हार्ट रेट सेंसर आणि ब्लड प्रेशर.
वॉचमध्ये एक्सेलेरोमीटर सेंसर, बॅरोमीटर सेंसर, जायरो सेंसर आणि लाइट सेंसर सुद्धा दिला आहे. बॅटरीसाठी यामधअये लिथियम-आयनचा वापर केला आहे. जी जवळजवळ 120 मिनिटापर्यंत पूर्ण चार्ज झाल्यानंतर पाच दिवस चालणार आहे.