फेसबुक न वापरणाऱ्यांना किंवा लॉगआऊट केलेले युजर्संनाही Facebook Live ऐकता येणार; जाणून घ्या काय आहे नवीन फिचर?

याचा अनेक परिणाम अनेक अॅपवरदेखील झाला आहे. मात्र, सध्या फेसबुक लाईव्हचं प्रमाण वाढलं आहे. अमेरिकेमध्ये फेसबुक लाईव्ह फिचर वापरण्याच्या प्रमाणात सुमारे 50 टक्के वाढ झाली आहे. भारतातदेखील अनेक राज्यातील मुख्यमंत्री सध्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. लॉकडाऊन काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिक आपले प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांना विचारत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता फेसबुकने आपल्या लाईव्ह पर्यायामध्ये काही नवे फिचर अपडेट केले आहेत.

फेसबुक (Photo Credits: ANI)

सध्या संपूर्ण जगासमोर कोरोनाचं संकट उभं आहे. याचा अनेक परिणाम अनेक अॅपवरदेखील झाला आहे. मात्र, सध्या फेसबुक लाईव्हचं (Facebook Live) प्रमाण वाढलं आहे. अमेरिकेमध्ये फेसबुक लाईव्ह फिचर वापरण्याच्या प्रमाणात सुमारे 50 टक्के वाढ झाली आहे. भारतातदेखील अनेक राज्यातील मुख्यमंत्री सध्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. लॉकडाऊन काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिक आपले प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांना विचारत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता फेसबुकने आपल्या लाईव्ह पर्यायामध्ये काही नवे फिचर (Facebook Live New Features) अपडेट केले आहेत.

यापुढे फेसबुक न वापरणाऱ्यांना किंवा लॉगआऊट केलेले युजर्संनाही फेसबुक लाईव्ह ऐकता येणार आहे. फेसबुक ऍपचे प्रमुख फिजी सिमो यांनी आपल्याय फेसबुक अकाऊंटवरून नवीन 'फेसबुक लाईव्ह' फिचर संदर्भात माहिती दिली आहे. या नव्या फिचर्समध्ये फेसबुकवर नसलेल्या लोकांनाही फेसबुक लाईव्ह ऐकता येणार आहे. यासाठी फेसबुक लाईव्हमध्ये फक्त ऑडिओ हा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. फेसबुकवर नसणाऱ्या नेटीझन्ससाठी हे फिचर अत्यंत उपयोगी ठरणार आहे. (हेही वाचा - पहा, असा दिसतो Covid-19 विषाणू; भारतीय शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच टिपला Coronavirus चा फोटो; लस शोधण्यासाठी होणार फायदा)

या नवीन फिचरचा लाभ घेण्यासाठी फेसबुककडून लवकरच टोल फ्री डायल इन पर्याय देण्यात येणार आहे. या डायल इनच्या माध्यमातून कोणीही फेसबुक लाईव्हवरील चर्चा ऐकू शकणार आहे. सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने नागरिकांना घराबाहेर न पडण्याच आवाहन केलं आहे. नागरिकांना 21 दिवस घरात राहणं मुश्किल झालं आहे. त्यामुळे अशा काळात नागरिक या फिचरचा वापर करू शकतात.