Facebook-Instagram Down: फेसबुक-इन्स्टा बंद पडल्यामुळे मार्क झुकरबर्गचं मोठे नुकसान

फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्हीवर कंटेंट लोड होत नसल्याचे समोर आले. तसेच काही ठिकाणी हे दोन्ही प्लॅटफॉर्म सुरु होण्यासाठी युजर्सना अनेक अडचणी येत होत्या.

Meta (PC - Wikimedia Commons)

जगभरातील यूजर्सना फेसबुक, (Facebook)  इन्स्टा (Instagram) आणि थ्रेड्सवर लॉगइन (Login) करण्यास अडचण येत होती. काही काळासाठी व्हॉट्सअ‍ॅप देखील बंद पडलं होतं. काही तासांनी ही सेवा सुरळीत झाली, मात्र तोपर्यंत मेटाचं (Meta Global Outage) अब्जावधींचं नुकसान झालं होतं. 5 मार्च रोजी अचानक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम काम करणे बंद झाले. फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्हीवर कंटेंट लोड होत नसल्याचे समोर आले. तसेच काही ठिकाणी हे दोन्ही प्लॅटफॉर्म सुरु होण्यासाठी युजर्सना अनेक अडचणी येत होत्या. या घटनेनंतर मार्क झुकरबर्गला (Mark Zuckerberg) जगभरातून ट्रोल करण्यात आलं. (हेही वाचा - Facebook-Instagram Down: लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम झाले डाऊन; आपोआप लॉग-आऊट होत आहेत अकाउंट्स)

मेटाच्या तीनही मोठ्या सोशल साईट्स बंद झाल्यानंतर कंपनीच्या शेअरची प्राईज 1.5 टक्क्यांनी खाली गेली. यामुळे मार्क झुकरबर्गचं सुमारे 100 मिलियन डॉलर्सचं नुकसान झालं असू शकतं.  भारतीय रुपयांमध्ये हा आकडा तब्बल 8 अब्ज रुपयांहून अधिक होतो. या आउटेजचा परिणाम फेसबुक मेसेंजरवरही होत आहे. महत्वाचे म्हणजे फक्त भारतच नाही तर, जगभरातील लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. या घटनेनंतर फेसबुकची मूळ कंपनी मेटाकडून वापरकर्त्यांना याबद्दलची माहिती देण्यात आली.

2021 मध्ये देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना टेक्निकल ग्लिचचा सामना करावा लागला होता. त्या वेळी तब्बल सात तासांसाठी सर्व सोशल मीडिया साईट्स बंद होत्या. यावेळी मात्र दोन तासांमध्येच सर्व सेवा पूर्ववत झाल्या. या ग्लोबल आउटेजचं नेमकं कारण अजूनही समोर आलेलं नाही.