Facebook, Instagram And WhatsApp Resume: सहा तासांपेक्षा जास्त कालावधीनंतर जगभरात सोशल मीडीया अॅप्सच्या सेवा पूर्ववत
आता अखेर 6 तासांपेक्षा जास्त कालावधीनंतर त्या पूर्ववत होत आहेत.
WhatsApp, Facebook आणि Instagram कडून सुमारे 6 तासांपेक्षा अधिक तासांच्या प्रतिक्षेनंतर मंगळवार (5 ऑक्टोबर) च्या सकाळी सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. जगभरात काल रात्री फेसबूक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप ठप्प झाल्याने युजर्सनी संताप व्यक्त केला होता. जगभरात कुठेच अॅप किंवा वेबसाईट अशा कुठेच व्हॉट्सअॅप, फेसबूक, इंस्टाग्राम वापरता येत नव्हते पण आता ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे. नक्की वाचा: जगभरात WhatsApp, Instagram आणि Facebook झाले Down; युजर्सनी ट्वीटरवर शेअर केले मजेशीर मीम्स .
भारतीय वेळेनुसार काल रात्री 8.45 पासून व्हॉट्सअॅप वेबसाईट downdetector.com वर सेवा बंद असल्याचे मेसेजेस येण्यास सुरूवात झाली होती. ज्या वेबसाईटवरून ट्राफिक बद्दल माहिती घेतली जाते त्यांनी देखील जगभरात फेसबूक देखील 8.57 पासून बंद असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. जगात कोट्यावधी इंस्टाग्राम युजर्सना देखील सेवा बंद असल्याचा त्रास झाला. दरम्यान व्हॉट्सअॅप वर मेसेज पाठवणं किंवा स्वीकारणं या सेवा ठप्प झाल्या होत्या.
मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्वीटर द्वारा सोशल मीडीया युजर्सनी व्हॉट्सअॅप, फेसबूक आणि इंस्टाग्राम सर्व्हिस बंद असल्याच्या तक्रारी नोंदवल्या होत्या.
फेसबूक पूर्ववत
फेसबूक चीफ मार्क झुकरबर्ग यांनी दिलेल्या मेसेज मध्ये 'फेसबूक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि मेसेंजर आता पुन्हा ऑनलाईन येत आहेत. आज झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. तुमच्या प्रियजणां सोबत कनेक्टेट राहण्यासाठी तुम्ही आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात हे आम्हांला ठाऊक आहे' असं म्हटलं आहे.