Facebook युजर्स सावध व्हा, 61 लाख भारतीयांचा डेटा लीक झाल्याने बचाव करण्यासाठी 'या' मार्गाचा वापर करा
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook वर बहुतांश युजर्स आहेत. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने फेसबुकचा वापर धोकादायक ठरु शकतो. खरंतर फेसबुकवरील मोठ्या प्रमाणात युजर्सचा डेटा लीक झाला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook वर बहुतांश युजर्स आहेत. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने फेसबुकचा वापर धोकादायक ठरु शकतो. खरंतर फेसबुकवरील मोठ्या प्रमाणात युजर्सचा डेटा लीक झाला आहे. Motherboard यांच्या रिपोर्ट्सनुसार, भारतासह जगातील जवळजवळ 500 मिलियन म्हणजे 50 तोटी लोकांच्या मोबाईल क्रमांकाची माहिती लीक झाली आहे. हे मोबाईल क्रमांक Telegram bot वर विकले गेले आहेत. यामध्ये जवळजवळ 6 लाख भारतीय युजर्सचा डेटा आहे. सुरक्षितता रिसर्चर Alon Gal यांच्याकडून ट्विटरवर ही माहिती दिली गेली आहे.(Google Chrome New Update: गुगल क्रोम मध्ये आले नवे 'पासवर्ड प्रोटेक्शन फिचर', कसे कराल अपडेट?)
Mpotherboard च्या रिपोर्टनुसार, जर एखाद्या व्यक्तीचा कॉन्टॅक क्रमांक क्रमांक असल्यास तो फेसबुक आयडीला Telegram Bot च्या मदतीने एक्सेस करु शकतो. यासाठी युजर्सला पे करावे लागणार आहे. ज्या लोकांनी Telegram Bot क्रिएट केले आहे. तो एक फोन क्रमांक किंवा फेसबुक आयडीला 20 डॉलर जवळजवळ 1450 रुपयांत विक्री करतात.
Gal च्या मते जे युजर्स Bot चालवतात ते फेसबुकच्या कोणत्याही देशातील कोणाच्या ही अकाउंटला लिंक असलेला फोन क्रमांक मिळवू शकतात. या पद्धतीची समस्या 2020 मध्ये समोर आली होती. अशातच जर युजर्सला आपला मोबाईल क्रमांक सुरक्षित ठेवायचा असल्यास तो फेसबुकवरुन हटवणे योग्य ठरेल.(Customer Care Scam: चुकूनही 'हे' 7 अॅप डाऊनलोड करू नका; अन्यथा तुमच्या अकाऊंटमधील सर्व पैसा होईल गायब)
फेसबुकवरुन कसा हटवाल Contact Number येथे पहा
-सर्वाधिक प्रथम Facebook अॅप सुरु करा.
-त्यानंतर साइडला दिलेल्या तीन टॉडवर क्लिक करा.
-आता Account Settings वर क्लिक करा.
-General ऑप्शनम निवडा.
-येथे गेल्यानंतर नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक दिसेल. तेथे तुम्हाला फोन ऑप्शनमध्ये जावे लागणार आहे.
- त्यानंतर Remove From Your Acount ऑप्शनवर क्लिक करा.
-मोबाईल क्रमांक आता तुम्हाला दिसेल. येथून Remove from your account वर क्लिक करा.
-आता पासवर्ड द्यावा लागणार आहे.
डेटा लीक झाल्याची ही घटना प्रथमच नाही आहे. याआधी 2019 मध्ये 41.9 कोटी फेसबुक युजर्सला डेटा असुरक्षित सर्व्हरवर दिसून आला आहे. मात्र कंपनीने ही समस्या नंतर ठिक केली. जगातील 100 देशांमधील फेसबुक डेटा लीक झाला आहे. तर भारतात ही संख्या 61,62,450 आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)