धक्कादायक! FaceApp वापरणाऱ्या लोकांची सुरक्षा धोक्यात; रशियन कंपनीला मिळत सर्व वैयक्तिक माहिती

सध्या या App च्या मदतीने सामान्य नागरिकांपासून बड्याबड्या स्टार्सपर्यंत अनेकांनी आपल्या म्हातारपणीचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. हे FaceAppChallenge तर सध्या धुमाकूळ घालत आहे. मात्र आता याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

FaceApp (Photo Credits: App Store)

आजकाल कोणत्या गोष्टी क्षणार्धात व्हायरल होतील हे सांगता येणार नाही, मग तो एखादा फोटो असो वा व्हिडिओ. मात्र सध्या एक App प्रचंड व्हायरल होत आहे. एकसाथ जगातील मंडळी हे App वापरून सोशल मिडियावर याबाबत चर्चा करताना दिसत आहेत. रशियन कंपनी वायरलेस लॅब (Wireless Lab) ने ताय्रार केलेले हे App आहे FaceApp (फेसअ‍ॅप). या App मध्ये तुम्ही म्हातारपणी कसे दिसाल ते दाखवले जाते. म्हणजे तुम्ही तुमचा सध्याचा फोटो यामध्ये अपलोड केलात तर तुम्ही म्हातारपणी कसे दिसाल ते हे App दाखवते.

सध्या या App च्या मदतीने सामान्य नागरिकांपासून बड्याबड्या स्टार्सपर्यंत अनेकांनी आपल्या म्हातारपणीचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. हे FaceAppChallenge तर सध्या धुमाकूळ घालत आहे. मात्र आता याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हे App आर्टिफिशियल (AI) इंटेलिजन्स अल्गोरिदमद्वारे काम करते. याच्याच मदतीने युजर्सचा चेहरा कसा दिसेल हे सांगितले जाते. युजर्सना म्हातारे दाखवण्यासाठी, सुरकुत्या किंवा पांढरे केस दाखवण्यासाठी न्यूरल नेटवर्कचा वापर केला जातो. याचमुळे युजर्सची सुरक्षितता धोक्यात आली आहे.,

Elizabeth Potts Weinstein या महिलेने ट्विटरवर एक पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते जेव्हा तुम्ही हे App वापरता तेव्हा तुम्ही आपोआप कंपनीला तुमचे फोटो, नाव, युजरनेम यासह इतर माहिती वापरण्याची परवानगी देता. यासाठी पुरावा म्हणून तिने App चे पॉलिसी पेज दाखवले आहे. इथे तुम्ही हे App वापरताना सेटींगमध्ये Allow FaceApp to Access मध्ये Photos Never असे सेट केल्यानंतरही, फोनधील फोटो अ‍ॅपला अ‍ॅक्सेस करता येतात. याचा अर्थ हे App एकदा डाउनलोड केल्यावर तुमची बरीच माहिती कंपनीकडे पोहचत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now