EPOS कंपनीने भारतात लाँच केली ADAPT प्रीमियम हेडफोन्सची सीरिज, वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
अलीकडेच EPOS कंपनीने ADAPT सीरिजचे 4 वायरलेस हेडफोन्ससह (Wireless Headphones) SP 30T प्लग एंड प्ले कॉन्फरन्स कॉलिंग स्पीकरसुद्धा (Conference Calling Feature) भारतात लाँच केला आहे.
डेनमार्क बेस्ड EPOS कंपनीने भारतात ADAPT प्रीमिअम सीरिजचे हेडफोन्स (Headphones) लाँच केले आहेत. गाणी ऐकण्याची, गेमिंग, चित्रपट, वेबसीरिज पाहण्यासाठी अनेकांना हेडफोन्सची गरज भासते. अशा वेळी आवाजाचा जबरदस्त अनुभव देणारे हेडफोन्स मिळावे अशी अनेकांची इच्छा असते. अशा ग्राहकांसाठी हे हेडफोन्स आवाजाचा भन्नाट अनुभव देतील. अलीकडेच EPOS कंपनीने ADAPT सीरिजचे 4 वायरलेस हेडफोन्ससह (Wireless Headphones) SP 30T प्लग एंड प्ले कॉन्फरन्स कॉलिंग स्पीकरसुद्धा (Conference Calling Feature) भारतात लाँच केला आहे.
EPOS चे हेडफोन्स ADAPT 300, ADAPT 400, ADAPT 500 आणि ADAPT 600 सीरिजमध्ये भारतात लाँच केले आहे. हे सर्व ऑडिओ प्रोडक्ट्स Microsoft Teams डेडिकेटेड बटनसह येतात. ADAPT 300 विषयी बोलायचे झाले तर यात BTS 800 USB डोंगल जरिए कनेक्ट केले जाऊ शकते. यात दोन मायक्रोफोन्स आहेत. जे उत्कृष्ट कॉल क्वालिटी देतात. त्याचबरोबर 46 तासांचा बॅटरी बॅकअप सुद्धा देतात.हेदेखील वाचा- Mi Watch Lite स्मार्टवॉच लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत
तर ADAPT 400 मध्ये नेकबँड स्टाइल डिझाईन सह लाँच करण्यात आला आहे. यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटुथ डोंगल देण्यात आले आहे. यात 14 तासांची बॅटरी बॅकअप मिळते. यात वॉईस असिस्टंटसाठी डेडिकेटेड बटनसुद्धा दिले आहे. तर ADAPT 500 मध्ये ANC आणि 46 तासांचा बॅटरी बॅकअप दिला आहे. तर ADAPT 600 मध्ये 30 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. या सर्वात ब्लूटुथ हेडफोन्स आणि डेडिकेटेड वॉईस असिस्टंट बटन दिले आहेत.
दरम्यान अॅपल (Apple) ने नुकतीच 'एअरपोड्स मॅक्स' (Apple AirPods Max) या नावाने त्यांचे पहिले वायरलेस हेडफोन्स (Over-Ear Wireless Headphones) बाजरात लॉन्च केले आहेत. भारतासह जगभरात 15 डिसेंबरपासून त्याची शिपिंग सुरू असून किंमत 59,900 रूपये असल्याचं जाहीर केले आहे. अमेरिकेसह 25 देशांमध्ये अॅपलचे हे नवे वायरलेस हेडफोन्स उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या एअरपॉड्स या EPOS च्या हेडफोन्सची चांगली टक्कर होईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)