Musk Shuts 2 Twitter India Offices: भारतात ट्विटरचे कार्यालय बंद, कर्मचाऱ्यांना Work From Home चे आदेश
ट्विटरचा खर्च कमी करण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी एलन मस्ककडून अनेक निर्णय घेण्यात येत असून आता त्यांने मुंबई आणि दिल्लीतील ट्विटरचे कार्यलय बंद करण्याचा निर्णय घेतला असून कमर्चाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत.
ट्विटरने (Twitter ) भारतातील आपल्या तीन ऑफिस पैकी दोन ऑफिस बंद केले आहेत. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरुन काम (Work From Home) करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुंबई (Mumbai) आणि दिल्ली (Delhi) या ठिकाणी असणारे ट्विटरचे ऑफिस बंद करण्याचा निर्णय ट्विटरने घेतला असून आता फक्त बंगळूरुमधील (Bengaluru) ट्विटरचे ऑफिस सुरु राहणार आहेत. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमितपणे पुर्वी प्रमाणेच ऑफिसमधून काम सुरु ठेवावे लागणार आहे. ब्लूमबर्ग न्यूजने याबद्दलचा रिपोर्ट दिला आहे. ट्विटरची मालकी घेतल्यानंतर एलन मस्ककडून (Elon Musk) ट्विटरची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी अनेक निर्णय घेताना दिसले आहे.
कॉस्ट कटींग साठी ट्विटरने जगभरातील ऑफिसेस बंद करण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे. यापुर्वी देखील ट्विटरने भारतासह जगभरातून मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. या निर्णयानंतर एलन मस्कवर मोठ्या प्रमाणावर टीका देखील झाली होती. एलन मस्कने कंपनीचा महसुल वाढवण्यासाठी ब्लू सब्सक्रिप्शन सारखी सेवा निर्माण केली. 2023 च्या शेवटपर्यंत ट्विटरला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचा एलन मस्कचा मानस आहे. (Twitter Down Again! एलन मस्क यांच्याकडे मालकी आल्यावर ट्विटर पुन्हा डाऊन, जगभरातील युजर्सना समस्या)
मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केल्यानंतर त्यांनी आमच्याकडे या शिवाय पर्याय नव्हता असे उत्तर दिले. त्यावेळी कंपनीला दररोज 40 लाख डॉलरचे नुकसान होत असल्याचे देखील त्याने सांगितले होते.