UMANG App वर e-RaktKosh उपलब्ध; या सोप्या पद्धतीने जाणून घ्या तुमच्या जवळील ब्लड बँकेतील रक्ताचा साठा
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
उमंग अॅपवर (UMANG App) आता e-RaktKosh उपलब्ध झालं आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. यामुळे तुमच्या जवळच्या ब्लड बँकेतील रक्ताची उपलब्धता, विविध रक्तदान शिबिर आणि रक्तदानासाठी रजिस्टर करण्यासंदर्भातील माहिती उपलब्ध होईल. दरम्यान, गेल्या वर्षी कोरोना व्हायरस संकटकाळात 'safe blood' सहज उपलब्ध होण्यासाठी हे अॅप लॉन्च करण्यात आले होते.
कोविड-19 संकटात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत होते. तसंच रुग्णांसाठी रक्ताचा पुरवठा उपलब्ध होताना अडचण निर्माण होऊ नये म्हणून अॅप लॉन्च करण्यात आले होते. आता त्यात नवा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
Ravi Shankar Prasad Tweet:
सरकारी सेवांसाठी उमंग अॅप हे ऑल इन वन अॅप आहे. आता यात e-RaktKosh चा पर्याय देखील उपलब्ध झाला आहे. जाणून घेऊया Umang App वरुन कोठे, किती रक्तसाठा आहे हे कसे तपासाल?
# सर्च बटणावर e-Rakt Kosh किंवा Blood availability असे टाईप करा.
# e-Rakt Kosh पर्याय सिलेक्ट करा.
# त्यानंतर 'Check Blood Availability option' ची निवड करा.
# त्यानंतर तुम्ही हॉस्पिटलचे नाव, प्रत्येक ब्लड ग्रुपप्रमाणे युनिट्सची संख्या, ठिकाण, तारीख, संपर्क हे पाहू शकता.
अॅपमधील या e-Rakt Kosh या पर्यायामुळे रक्ताची उपलब्धता तपासणे, सहज शक्य होणार आहे.