खुशखबर! टीव्ही पाहणे होणार स्वस्त; TRAI च्या नव्या नियमांनुसार केवळ 130 रुपयांत पाहता येणार 200 चॅनेल्स
या डिस्काउंटमुळे ग्राहक प्रचंड खूश आहेत.
टीव्ही पाहण्याची आवड असलेल्यांसाठी आनंदाची बातमी! DTH आणि केबल टीव्ही सब्सक्रायबर्संना आता केवळ 130 रुपयांत 200 चॅनेल्स पाहता येऊ शकणार आहेत. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, (TRAI)नॅशनल टेरिफ ऑर्डर 2.0 मध्ये मल्टी टीव्ही युजर्ससाठी एनसीएफ सह 130 रुपयात फ्री टू एअर चॅनेल दाखवण्याची सूचना केली आहे. या डिस्काउंटमुळे ग्राहक प्रचंड खूश आहेत. तर ब्रॉडकास्टर्स आणि ऑपरेटर्सकडून डिस्काउंट दिला आहे. या डिस्काउंटचा ग्राहकांना प्रचंड फायदा होणार आहे. नव्या टेरिफ ऑर्डरच्या युजर्सच्या संख्येत आता डीटीएच आणि केबल टीव्ही सर्विसशी जोडणार आहे.
टेरिफ महाग झाल्यानंतर सब्सक्रिप्शन सब्सक्रिप्शनचे नुतनीकरण केले नव्हते. त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात होती की, नवीन राष्ट्रीय टेरिफ ऑर्डर नंतर टीव्ही सब्सक्रिप्शन 14 टक्के स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. TRAI देणार आता Set Top Box ऐवजी DTH बदलण्याची सुविधा
गेल्या वर्षीच्या टॅरिफ वाढविल्यानंतर अनेक युजर्सने तक्रारी केल्या होत्या. सुरुवातीला नेटवर्क कॅपिसिटी फी नव्हती. परंतु, युजर्सला प्रत्येक महिन्याला 153 रुपये देणे बंधनकारक होते. म्हणूनच युजर्सला टीव्हीच्या बिलात दर महिन्याला 20 टक्के जास्त रक्कम मोजावी लागत होती. तसेच युजर्सने नेटवर्क कॅपिसिटी फीला 100 रुपये कमी करण्याची मागणी केली होती.
मात्र आता नवीन 130 रुपयांच्या प्लानमुळे ग्राहक खूप खुश आहेत. याआधी केवळ 100 चॅनेल दिसत होते. मात्र आता ही संख्या 200 इतकी झाली आहे. हा नवीन टॅरिफ प्लान 1 मार्च 2020 पासून लागू होणार आहे. परंतु, या निर्णयाविरोधात ब्रॉडकास्टर्सने कोर्टात याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे.