WhatsApp Warning: व्हॉट्सअॅपवर चुकूनही पाठवू नका 'हे' 3 प्रकारचे व्हिडिओ, अन्यथा तुम्हाला जावं लागेल जेलमध्ये

मात्र, आता लोकांना विशिष्ट प्रकारचे व्हिडिओ पाठवण्यापूर्वी काळजी घेणं आवश्यक आहे, अन्यथा त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Whatsapp प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

WhatsApp Warning: व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप्लिकेशन आहे. याद्वारे लोक फोटो व्हिडीओ डॉक्युमेंटही पाठवतात. पण, तुम्हाला माहिती आहे का की याद्वारे अनेक मोठे गुन्हेही घडत आहेत. यासोबतच लोक टेक्स्ट मेसेज पाठवण्यासोबत व्हॉट्सअॅपवर व्हायरल व्हिडीओही पाठवतात. मात्र, आता लोकांना विशिष्ट प्रकारचे व्हिडिओ पाठवण्यापूर्वी काळजी घेणं आवश्यक आहे, अन्यथा त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

चाइल्ड पोर्नोग्राफी -

चाइल्ड पॉर्न व्हिडिओ देखील गुन्ह्याच्या श्रेणीत येतात. POCSO कायदा 2012 अंतर्गत बाल पोर्नोग्राफी हा भारतात गुन्हा समजण्यात येतो. जर तुम्ही 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवरील बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलात तर तुम्ही कायदेशीर गुन्हेगार झाला आहात. भारतात, तुम्हाला पॉस्को कायद्याच्या कलम 14 अंतर्गत दोषी ठरवून शिक्षा होऊ शकते. (हेही वाचा - Twitter Video Update: आता ट्वीटरचं ही टिकटॉक होणार, जाणून घ्या ट्वीटरचा नवा व्हिडीओ अपडेट)

शेअर मार्केट टिप्स -

याशिवाय, जर तुम्हाला प्रमाणित स्टॉक मार्केटचे ज्ञान नसेल, तर तुम्ही कोणालाही ऑनलाइन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देऊ नये. यासोबतच इनसाइडर ट्रेडिंग करू नये, कारण असे करणे सेबीच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते. अशा स्थितीत तुमच्याविरुद्ध कोणी तक्रार केल्यास किंवा सेबीच्या तपासात तुम्ही दोषी आढळल्यास तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो आणि तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते.

गर्भपात माहिती आणि व्हिडिओ

वास्तविक, भारतात गर्भपात हा कायदेशीर गुन्हा आहे. गर्भपात करताना पकडल्यास रुग्णावर तसेच रुग्णालयावर कारवाई केली जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही चुकून गर्भपाताचा व्हिडिओ घरी कोणाला पाठवला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. तसेच गर्भपाताचे देशी फॉर्म्यूला सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नका.

तुम्हीही गर्भपाताचे औषध घेत असल्याचा व्हिडिओ पाठवलात तर पोलिस तुमच्या घरापर्यंत पोहोचू शकतात. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट 1971 नुसार गर्भपात हा गुन्हा मानला जातो. गर्भपात करवून घेणाऱ्यांना तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद कायद्यात आहे.