Digital Key: कार अनलॉकड करण्यासाठी आयफोन, Apple Watch मध्ये 'डिजिटल की' सुविधा लवकरच
ही प्रणाली वापरुन युजर्सला आपला खिसा अथवा बॅगमधून आयफोन न काढताही कार अनलॉक करता येणार आहे. ही सुविधा पुढच्या वर्षीपासून उपलब्ध होईल. बीएमडब्ल्यू जुलैमध्ये विकल्या जाणाऱ्या आपल्या 5 श्रृंखलांसोबत अॅपल कार की सुविधा देणार असल्याचे समजते.
अॅपल आयफोन ( Apple iPhone) आणि अॅपल घड्याळ (Apple Watch) युजर्सना लवकरच एक छान सुविधा मिळणार आहे. ज्याद्वारे आपण आयफोन आणि घ्याळाच्या माध्यमातूनही आपली कार अनलॉक करु शकणार आहात. बीएमडब्ल्यू हे फिचर्स सपोर्ट करणारी पहिली वाहन निर्माता कंपनी आहे. आयओएस 14 च्या माध्यमातून तुम्हाला तुमची कार अनलॉक करता येणार आहे. सिस्टमला 'डिजिटल कार की' (Digital Key) असे नाव देण्यात येणार आहे. ज्यात नियर फिल्ड कम्युनिकेशन (NFC) तंत्रज्ञानही उपलब्ध असणार आहे.
डिजिटल कार की प्रणाली वापरुन युजर्सला आपली कार अत्यंत सुरक्षीतपणे स्टार्ट आणि अनलॉक करता येणे शक्य होणार असल्याचे एआयएनएस वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात म्हटले आहे. अॅपलने सोमवारी आपल्या आभासी 'डब्ल्यूडब्ल्यूडीसी 20' डेवलपर परिषदेत म्हटले की, या नव्या डिजिटल कार की प्रणालीच्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने संदेशवहन केले जाऊ शकते. जर तुमचे डिव्हाईस हरवले तरीही यूजर्स आयक्लाऊडच्या मदतीने ही सुविधा बंध करु शकते. नवे आयओएस 14 मध्ये एनएफसी सपोर्ट सिस्टमसोबत बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे. (हेही वाचा, इंटरनेटशिवाय Google Map चा 'या' पद्धतीने करा वापर)
अॅपल यू1 चिपच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या स्थानिक जागृकतेसाठी अल्ट्रा वाईडब्लँड तंत्रज्ञानावर आधारीत डिजिटल कार कीचे नेस्ट जनरेशनही लॉन्च करण्यात येणार आहे. ही प्रणाली वापरुन युजर्सला आपला खिसा अथवा बॅगमधून आयफोन न काढताही कार अनलॉक करता येणार आहे. ही सुविधा पुढच्या वर्षीपासून उपलब्ध होईल. बीएमडब्ल्यू जुलैमध्ये विकल्या जाणाऱ्या आपल्या 5 श्रृंखलांसोबत अॅपल कार की सुविधा देणार असल्याचे समजते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)