खुशखबर! D2H Magic Stick फक्त 399 रु. मध्ये उपलब्ध, तीन महिने मोफत सेवा; Sony LIV, Zee5, ALT Balaji पहा फ्रीमध्ये

यातून मार्ग काढण्यासाठी अनेक डीटीएच ऑपरेटर आता या सेवा स्वतःमार्फत विविध प्रकारे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत, यासाठी सध्या मार्केटमध्ये दाखल झाले आहे डी2एच (D2H) ही सेवा

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

फेब्रुवारीमध्ये डीटीएच मार्केटसाठी (DTH Market) ट्रायच्या नवीन नियमांची अंमलबजावणी झाल्यापासून, बऱ्याच टीव्ही दर्शकांनी स्वस्त मनोरंजन बिलांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा (OTT Platforms) मार्ग निवडला. यामुळेच लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सदस्यता वाढली आहे. यापैकी बहुतेक ओटीटी प्लॅटफॉर्म फोन आणि टॅब्लेटवर अ‍ॅप म्हणून उपलब्ध आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी अनेक डीटीएच ऑपरेटर आता या सेवा स्वतःमार्फत विविध प्रकारे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत, यासाठी सध्या मार्केटमध्ये दाखल झाले आहे डी2एच (D2H) ही सेवा.

डीटीएच ऑपरेटर आता नवीन पोर्टेबल डिव्हाइस (Portable Device) घेऊन आला आहे, ज्याद्वारे ग्राहक काही लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंट पाहू शकतील. या डिव्हाइसला डी2एच मॅजिक स्टिक (D2H Magic Stick) असे म्हटले जाते. डी2एच सेट-टॉप बॉक्सद्वारे ऑनलाइन कंटेंट पाहण्यासाठी यूएसबी डोंगलसारखा याचा उपयोग केला जाऊ शकतो. सध्या डी2एच या डिव्हाइसची प्रारंभिक किंमत ही फक्त 399 रुपये इतकी आहे. परंतु नंतर डिव्हाइस 999 रुपयांच्या किंमतीवर उपलब्ध होईल. (हेही वाचा: Jio Giga Fiber सोबत HD TV फ्री ;Jio Phone 3 लॉन्चिंगसाठी तयार; मुकेश अंबानी यांनी दिली माहिती, जाणून घ्या अधिक)

डी2एच मॅजिक स्टिक अमेझॉन फायर स्टिक आणि टाटा स्काय बिन्जेसारखेच आहे. हे केवळ डी 2 एच-एचडी सेट-टॉप बॉक्सवरच कार्य करेल. सुरुवातीचे तीन महिने ग्राहक ही स्टिक मोफत वापरू शकतील. त्यानंतर त्यांना सदस्यता शुल्क म्हणून दरमहा 25 रुपये द्यावे लागतील. हे डिव्हाइस सोनी एलआयव्ही (Sony LIV), वॉचो, झी 5, एएलटी बालाजी (ALT Balaji) आणि हंगामा प्ले या अ‍ॅप्ससह प्रीलोड केले आहे. हॉटस्टार, अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स सारख्या सेवा या डिव्हाइसवर उपलब्ध नसतील. हे डिव्हाइस आरएफ रिमोट कंट्रोलरद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते.

हे डिव्हाइस वापरण्यासाठी तुम्हाला ते वायफायशी कनेक्ट करणे गरजेचे आहे. तर अशाप्रकारे या स्टिकद्वारे तुम्ही लाईव्ह चॅनेलसह इतर अनेक सेवांचा लाभ घेऊ शकता.