D2h कंपनीच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत बदल, आता मिळणार तीन NCF स्लॅब

या बदलावानंतर आता डी2एच ग्राहकांना तीन NCF स्लॅब उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी ग्राहकांना चार स्लॅब देण्यात आले होते.

TV Channels | (Photo Credits: File)

D2h कंपनीने त्यांच्या नेटवर्क कॅपॅसिटी फी मध्ये पुन्हा बदल केला आहे. या बदलावानंतर आता डी2एच ग्राहकांना तीन NCF स्लॅब उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी ग्राहकांना चार स्लॅब देण्यात आले होते. गेल्या एका आठवड्यापूर्वीच डीटीएच ऑपरेटर्सने त्यांच्या एनसीएफमध्ये बदल केला आहे. एनसीएफच्या गेल्या स्ट्रक्चरमध्ये डी2एचसाठी फक्त दोन स्लॅब दिले होते. एक स्लॅब 200 एसडी चॅनल्सचा होता तर दुसरा स्लॅब मध्ये 200 पेक्षा अधिक चॅनल्स ऑफर केले जात होते.

कंपनीच्या वेबसाईटनुसार, डीटीएच ऑपरेटर ग्राहकांना 130 रुपये (153.40 रुपये टॅक्स) प्रति महिना रिचार्जवर 200 एसडी चॅनल्सची सुविधा देणार आहे. तर 150 रुपयांच्या (177 रुपये टॅक्स) प्रति महिना रिचार्जसाठी 201 ते 220 एसडी चॅनल्स ग्राहकांना पाहता येणार आहेत. या नव्या स्ट्रक्चरमध्ये 220 चॅनल्सपेक्षा अधिक स्लॅब आहेत. त्यासाठी ग्राहकांनी एनसीएफ 160 रुपये प्रति महिना द्यावे लागणार आहेत. यापूर्वी एनसीएफसाठी फक्त 2 स्लॅब होते. त्यामधील एकात ग्राहकांना 130 रुपये प्रति महिनासाठी 200 एसडी चॅनल्स पाहता येत होते. तर 160 रुपयांच्या महिन्याभराच्या पॅकमध्ये टॅक्सशिवाय 200 पेक्षा अधिक चॅनल पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते.(Tata Sky च्या SD, HD सेट-अप बॉक्सच्या किंमतीत वाढ) 

तर घरात एकापेक्षा अधिक टीव्ही कनेक्शन असलेल्यांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच डी2एच सब्सक्रायबर्स ज्यांच्याकडे एकापेक्षा अधिक टीव्ही कनेक्शन आहे त्यांना फक्त 50 रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच ऑपरेटर सध्या दोन एसडी चॅनल्स मिळून 1 एचडी चॅनल अशा प्रमाणे मोजणी करतात. त्यानुसार ग्राहकांकडून एनसीएफ वसूल केले जातात. ट्रायने जानेवारी महिन्यात काही नवे नियम सुद्धा लागू केले आहेत. त्यानुरुप, 200 एसजी चॅनल्ससाठी 130 रुपये एनसीएफ लागू करण्यात आला आहे. ऐवढेच नाहीतर टाटा स्काय, डिश टीव्ही, एअरटेल डिजिटल यांनी सुद्धा त्यांच्या प्लॅनमध्ये बदल केला आहे.



संबंधित बातम्या

Babar Azam Milestone: बाबर आझमने T20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, विराट कोहली, ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत सर्वात जलद 11,000 धावा करणारा खेळाडू ठरला

SA Beat PAK 2nd T20I 2024 Scorecard: दुसऱ्या टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 7 गडी राखून केला पराभव, मालिकेत घेतली 2-0 अशी आघाडी, रीझा हेंड्रिक्सने झळकावले शतक

AUS W vs IND W 3rd ODI 2024 Live Streaming: आज भारताच्या महिलांसमोर मालिका वाचवण्याचे आव्हान, तर ऑस्ट्रेलिया मालिका जिंकण्यास सज्ज; तुम्ही येथे पाहून घ्या सामन्याचा आनंद

AUS W vs IND W 3rd ODI 2024 Live Streaming: ऑस्ट्रेलियाविरूध्द टीम इंडियाचा तिसरा वनडे सामना, क्लीन स्वीप टाळण्याचे भारतीय महिला संघासमोर आव्हान; जाणून घ्या कुठे पाहणार थेट प्रक्षेपण