VI App च्या माध्यमातून आता ग्राहकांना करता येणार COVID19 लसीकरणासाठी स्लॉट बुकिंग, जाणून घ्या अधिक

याच्या माध्यमातून नागरिकांना लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येतो. मात्र एकच अॅप लसीकरणाचा स्लॉट बुकिंग करण्यासाठी उपलब्ध असल्याने नागरिकांना काही समस्यांना सुद्धा सामोरे जावे लागत आहे.

Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)nation)

देशात कोविड19 लसीकरणासाठी भारत सरकारने CoWIN अॅप नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. याच्या माध्यमातून नागरिकांना लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येतो. मात्र एकच अॅप लसीकरणाचा स्लॉट बुकिंग करण्यासाठी उपलब्ध असल्याने नागरिकांना काही समस्यांना सुद्धा सामोरे जावे लागत आहे. कारण एकाच वेळी हजारो लोकांकडून स्लॉट बुकिंगची प्रक्रिया केली जात आहे. याच कारणामुळे ही प्रक्रिया अगदी सुकर बनवण्यासाठी शासकीय अॅपने आपल्या प्लॅटफॉर्मवर काही खासगी अॅप जोडण्यास परवानगी दिली आहे. ज्यामुळे युजर्सला अगदी सोप्प्या पद्धतीने लसीकरणाचा स्लॉट बुकिंग करता येणार आहे.

खासगी अॅपच्या माध्यमातून लसीकरणासाठी स्लॉट बुक करण्याकरिता आधी paytm चा वापर करण्यात येत होता. मात्र त्यानंतर Eka Care App, HealthyfyMe, Reliance MyJio, Airtel Thanks App आणि PhonePe च्या माध्यमातून लसीकरणासाठी स्लॉट बुकिंग करण्याची सुविधा नागरिकांसाठी सुरु केली. अशातच आता VI ने सुद्धा आपल्या अधिकृत अॅपच्या माध्यमातून कोविड19च्या लसीसाठी स्लॉट बुक करण्याची सुविधा देत आहे. कंपीने त्यांचे अॅप हे कोविन अॅप सोबत इंटीग्रेट केले आहे. युजर्सला VI च्या माध्यमातूनच लसीकरणाचा स्लॉट सर्च करता येणार आहे. पण अंतिम प्रोसेस सरकारच्या कोविन प्लॅटफॉर्मवरच पूर्ण होणार आहे. तर जाणून घ्या VI App च्या माध्यमातून कशा प्रकारे तुम्ही लसीकरणाचा स्लॉट बुक करु शकता.(Reliance Jio, Airtel & Vi Annual Prepaid Plans: जिओ, एअरटेल आणि व्हिआय चा कोणता वार्षिक प्लॅन अधिक फायदेशीर? जाणून घ्या)

-प्रथम तुमच्या स्मार्टफोनवर VI App सुरु करा. येथे तुम्हाला Get Yourself Vaccinated Today चे पोस्टर शोधा. हे पोस्टर तुम्हाला मोबाइल स्क्रिनच्या खालील भागात दिसेल. त्यासाठी तुम्ही डाव्या बाजूला स्वाइप करा.

-पोस्टर मिळाल्यानंतर आता त्यावर क्लिक करा. आता एक पेज सुरु होईल तेथे तुमचे राज्य आणि जिल्ह्या कोणता आहे ते निवडावे लागणार आहे. आता तुमच्या परिसरातील लसीकरणाचा स्लॉॉ सर्च करण्यासाठी पिन कोड टाका.

-आता तुम्हाला तुमच्या घराजवळचा लसीकरणाचा स्लॉट दाखवला जाईल. येथे तुम्हाला वयोगट, लसीचे नाव आणि पेड की फ्री मध्ये लस हवी आहे याची माहिती द्यावी लागेल.

-एकदा ही सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला कोणत्या ठिकाणी लस उपलब्ध आहे हे दाखवले जाईल.

-ऑप्शन निवडल्यानंतर Book On CoWIN बटणावर क्लिक करा. आता तुम्हाल अंतिम स्टेपसाठी CoWIN पोर्टलवर नेले जाईल.

दरम्यान, VI App मध्ये काही फिल्टर सुद्धा उपलब्ध आहेत. जेणेकरुन युजर्सला वयोगट, नाव आणि लसीकरणासंबंधित अन्य माहिती सुद्धा मिळेल. वोडाफोन-आयडियाच्या प्रीपेड आणि पोस्टपेड या दोन्ही ग्राहकांना VI App चा वापर करुन लसीकरण स्लॉट बुक करु शकता. हे अॅप अॅन्ड्रॉइड आणि आयओएस युजर्ससाठी उपलब्ध आहे.