Cashless payments: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कॅशलेस पेमेंटमध्ये झपाट्याने वाढ, सहा वर्षांत 20.4% वरून 58.1% पर्यंत वाढला वापर

गेल्या सहा वर्षांत भारताने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कॅशलेस पेमेंटमध्ये मोठी वाढ केली आहे. 2018 मध्ये कॅशलेस पेमेंट फक्त 20.4 टक्के होते ते आता 2024 मध्ये 58.1 टक्क्यांपर्यंत आले आहे.

Photo Credit - PIxabay

Online Payment Growth: गेल्या सहा वर्षांत भारताने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कॅशलेस पेमेंटमध्ये (E Commerce Payments)मोठी वाढ केली आहे. 2018 मध्ये कॅशलेस पेमेंट फक्त 20.4 टक्के होते. ते आता 2024 मध्ये 58.1 टक्क्यांपर्यंत आले आहे. त्याबाबतच्या डेटाचे विश्लेषण करणारी कंपनी ग्लोबलडेटाने एका अहवालात ही माहिती दिली आहे. रोख पैशांच्या व्यवहारांप्रमाणेच इतर पेमेंट पर्यायांमध्ये UPI, डेबिट कार्ड(Debit Card)आणि क्रेडिट कार्ड(Credit Card)यांचा समावेश होतो. कॅशलेस पेमेंट्सच्या वाढीसाठी मोबाईल वॉलेटचा जास्त वापर होत असल्याचे देखील या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. हे UPI द्वारे समर्थित आहे आणि क्यूआर कोड स्कॅन करून रिअल-टाइम मोबाईल पेमेंटची सुविधा देते.(हेही वाचा:Online Shopping: माहितीचा ओव्हरलोड आणि जाहिरातींच्या भडिमारामुळे 88% भारतीयांची ऑनलाइन खरेदीला नापसंती; अहवालातून सत्य समोर )

अहवालात म्हटले आहे की आशिया-पॅसिफिक (APAC) प्रदेशात, मोबाइल आणि डिजिटल वॉलेट सारख्या पेमेंट प्लॅटफॉर्मने रोख आणि बँक व्यवहारांच्या पारंपारिक पद्धती पूर्णपणे बदलल्या आहेत. अहवालात पुढे ठळकपणे नमूद करण्यात आले आहे की असे पर्यायी पेमेंट प्लॅटफॉर्म चीन आणि भारतासारख्या देशांमध्ये प्रथम लोकप्रिय होते. आता आशिया-पॅसिफिक प्रदेशातील बाजारपेठांमध्ये देखील लोकप्रिय होत आहेत.

एकूण कॅशलेस पेमेंटपैकी जवळपास दोन तृतीयांश पेमेंट संपूर्ण एकटा चीन करतो. आशिया पॅसिफिक प्रदेशात चीन आघाडीवर आहे. मात्र, भारतही या बाबतीत मागे नाही. 2018 पासून भारतात पर्यायी पेमेंट प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. ग्लोबलडेटाच्या अहवालात असे दिसून आले आहे की आशिया पॅसिफिक क्षेत्रातील फिलिपिन्स, मलेशिया आणि इंडोनेशिया सारख्या देशांमध्ये सध्या हाट ट्रेंड दिसत आहे. मात्र, त्यांच्या तुलनेत चीन आणि भारतामध्ये पर्यायी पेमेंट प्लॅटफॉर्मचा अवलंब करण्याचे प्रमाण जास्त असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कंपनीच्या वित्तीय सेवा ग्राहक सर्वेक्षण 2023 नुसार, जागतिक स्तरावर सर्वात मोठी ई-कॉमर्स बाजारपेठ असलेल्या चीनमध्ये 65 टक्क्यांहून अधिक कॅशलेस पेमेंटसाठी पर्यायी प्लॅटफॉर्म जबाबदार आहेत. त्याचे प्रमाण 2018 मध्ये 53.4 टक्के पेमेंट होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now