खुशखबर! BSNL ने आणला 599 रुपयात 450GB चा जबरदस्त डेटा प्लान, वाचा सविस्तर
याच्या वैधतेमध्ये यूजर्स दर दिवसा 100 मोफत SMS पाठवू शकतील. चेन्नई ने एका ट्विटमध्ये या प्पीडे प्लान बाबत माहिती दिली आहे
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कंपनीने एक जबरदस्त इंटरनेट डेटा प्लान आणाल आहे. ज्यात 599 रुपयात तुम्हाला 450GB चा डेटा मिळत असून अनलिमिटेड कॉल्सची (Unlimited Calls) सुविधा देखील देण्यात आली आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) अनेक Work From Home करत आहेत. असा वेळी त्यांना इंटरनेटच्या कमी स्पीडमुळे कामात व्यत्यय येऊ नये यासाठी BSNL ने हा प्लान आणला आहे. या प्लानमध्ये तुम्हाला 90 दिवसांची वैधता मिळणार आहे. त्यासोबतच यात तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि दर दिवशी 5GB डेटा मिळत आहे.
तसेच वर्क फ्रॉम होम (Work From Home) करणा-यांना स्पेशल टॅरिफ वाउचर मिळत आहे. याच्या वैधतेमध्ये यूजर्स दर दिवसा 100 मोफत SMS पाठवू शकतील. चेन्नई ने एका ट्विटमध्ये या प्पीडे प्लान बाबत माहिती दिली आहे. BSNL ग्राहकांना दररोज मिळणार 3GB डेटा-कॉलिंगची सुविधा, पहा अन्य रिचार्जच्या किंमती
BSNL च्या या 599 रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स सुविधा मोफत मिळेल. मात्र त्याला सुरुवातीचे 250 मिनिटांची मर्यादा देण्यात आली आहे. त्याशिवाय दर दिवसा 5GB डेटा आणि 100 SMS मोफत मिळत आहे.
याआधी बीएसएनएल दररोज 3जीबी डेटा असणारे प्रीपेड प्लॅन उपलब्ध करुन देत आहे. या प्लॅनची वैधता 8 दिवस ते 365 दिवसांसाठी आहे. बीएसएनएल कंपनीचा 78 रुपयांच्या रिचार्ज हा सर्वाधिक स्वस्त प्लॅन आहे. हा रिचार्ज 8 दिवसांची वॅलिडिटी असणारा आहे. यामध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. त्याचसोबत युजर्सला Eros Now मनोरंजनाची सर्विसचे सब्सक्रिप्शनचा सुद्धा लाभ घेता येणार आहे.