BSNL ने 398 रुपयांच्या प्रीपेड योजनेत केला मोठा बदल; आता ग्राहकांना 90 दिवसांसाठी घेता येणार अमर्यादित कॉलिंगचा लाभ

परंतु, 398 रुपयांच्या प्रीपेड योजनेद्वारे कंपनीने वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंग तसेच अमर्यादित डेटा उपलब्ध करुन दिला आहे.

BSNL (Photo Credit: Livemint)

भारताची सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल अन्य प्रतिस्पर्धी कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी नव्या योजना लाँच करत आहे. कंपनीने आतापर्यंत अशा अनेक योजना सादर केल्या आहेत. ज्यात प्रीपेड आणि पोस्टपेड चा समावेश आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना मोठ्या फायदा देण्यात येत आहे. त्याचबरोबर, कंपनीने आता आपल्या वापरकर्त्यांसाठी एक विशेष भेट आणली आहे. बीएसएनएलने आपल्या 398 रुपयांच्या प्रीपेडचा पुनर्विचार केला आहे आणि यावेळी योजनेत बरेच विशेष बदल करण्यात आले आहेत. बीएसएनएलच्या 398 रुपयांच्या योजनेबद्दल महत्वाच्या बाबी जाणून घेऊयात...(Jio ने लाँच केला धमाकेदार प्लान; ग्राहकांना देण्यात येणार एका वर्षासाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेटची सेवा, जाणून घ्या सविस्तर)

बीएसएनएलने लाँच केला 398 रुपयांचा प्लान -

बीएसएनएलने आपली 398 रुपयांची प्रीपेड योजनेत अनेक बदल आणि फायद्यांसह पुन्हा लाँच केली आहे. कंपनीच्या या योजनेत आता वापरकर्त्यांना 90 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळेल. ही योजना गेल्या वर्षी जानेवारीत प्रमोशनल ऑफर म्हणून आणली गेली होती आणि त्याची वैधता फक्त 9 एप्रिलपर्यंत होती. त्याचबरोबर कंपनीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर जाहीर केले की 398 रुपयांच्या स्पेशल टॅरिफ व्हाउचर (एसटीव्ही) ची वैधता तीन महिन्यांसाठी वाढविण्यात आली आहे. म्हणजेच आता 8 जुलैपर्यंत वापरकर्ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. (वाचा -Airtel च्या प्रीपेड युजर्संना धक्का! 100 रुपयांखालील 'हा' रिचार्ज प्लॅन बंद)

दरम्यान, आतापर्यंत कंपनीकडे अशी कोणतीही योजना नव्हती ज्यामध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. परंतु, 398 रुपयांच्या प्रीपेड योजनेद्वारे कंपनीने वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंग तसेच अमर्यादित डेटा उपलब्ध करुन दिला आहे. या व्यतिरिक्त, वापरकर्ते दररोज 100 एसएमएस देखील पाठवू शकतात. यापूर्वी बीएसएनएलने आपल्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी तीन DSL ब्रॉडबँड योजना देखील सुरू केल्या आहेत. यात 299, 399 आणि 55 रुपयांच्या प्लानचा समावेश आहे. या तीन प्लानमध्ये वापरकर्त्यांना 10 एमबीपीएसचा वेग मिळेल.



संबंधित बातम्या