Boult Audio चे नवीन इयरफोन लाँच; 10 मिनिटे चार्ज करून ऐका 10 तास म्यूझिक
कंपनीने त्यांना ipx5 रेटिंगसह लाँच केले आहे.
कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड Boult Audio ने भारतात आपले नवीन इयरफोन ProBass Curve X लॉन्च केले आहेत. हे नेकबँड स्टाईल इयरफोन जलद चार्जिंग तंत्रज्ञानासह येतात. कंपनीच्या मते, केवळ 10 मिनिटांच्या चार्जिंगसह ग्राहकांना 10 तासांपर्यंत म्यूझिक ऐकता येईल. कंपनीने त्यांना ipx5 रेटिंगसह लाँच केले आहे. म्हणजेच ते पाणी आणि घाम प्रतिरोधक आहे.
Boult Audio ProBass Curve X किंमत -
विशेष म्हणजे कंपनीने त्यांची किंमतही तुमच्या बजेटमध्ये ठेवली आहे. Bolt Audio ProBass Curve X ची भारतीय बाजारात किंमत 999 रुपये आहे. हे ब्लॅक आणि ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. हे नेकबँड स्टाइल इयरफोन अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असतील. कंपनी 1 वर्षाच्या वॉरंटीसह याची विक्री करत आहे. (वाचा - Xiaomi कडून MIUI 13 लॉन्च, 'या' स्मार्टफोनला मिळणार अपडेट्स)
संगीत प्रेमींसाठी खास -
Boult Audio ProBass Curve X इयरफोन सिलिकॉन बँड आणि एअरटिप्ससह येतात. यात अॅडजस्टेबल क्लिपसह लवचिक नेकबँड आहे. Boult Audio मधील नवीन इयरफोन्स हाय-फाय साउंड आणि माइक वूफरसह अतिरिक्त बास देतात. चांगल्या कॉलिंग अनुभवासाठी यात सिग्नल अॅम्प्लिफायर आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे इयरफोन बाहेरचा आवाज रोखतात आणि संगीताचा उत्तम अनुभव देतात. (वाचा - Instagram Reels New Feature: आता इंस्टाग्राम रील्सवर 90 सेकंदांचा व्हिडिओ बनवता येणार आहे, नवीन फीचर लवकरच होणार लाँच)
Boult Audio ProBass Curve X इयरफोन्सना पाणी आणि स्थिती प्रतिरोधक बनवण्यासाठी IPX5 रेट केले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ v5 देण्यात आला आहे आणि ते मॅग्नेटिक इयरबडसह येतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, इयरफोन्स फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह येतात जे 10 मिनिटांच्या चार्जिंगसह 10 तासांपर्यंत प्लेटाइम देतात. यामध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट चार्जिंगसाठी उपलब्ध आहे.