Boat Rockerz 255 Pro+ वायरलेस ईयरफोन्स भारतात लाँच, काय आहेत याची खास वैशिष्ट्ये
त्यामुळे आता संगीत ऐकताना कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही आणि तुम्ही तासनतास तुमची आवडती गाणी किंवा आवडत्या व्यक्तीसोबत गप्पा मारू शकता.
आपल्या ग्राहकांना संगीताचा जबरदस्त अनुभव देण्यासाठी Boat कंपनी आपले एकाहून एक सरस असे गॅजेट्स भारतात आणण्याचे काम सुरुच ठेवले आहे. नुकताच Boat कंपनीने आपला जबरदस्त ईयरफोन भारतात लाँच केला आहे. Boat Rockerz 255 Pro+ वायरलेस ईयरफोन (Boat Rockerz 255 Pro+ Wireless Earphones) असे या गॅजेटचे नाव असून नुकताच हा भारतात लाँच झाला आहे. या ईयरफोनचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यात 40 तासांची बॅटरी लाईफ मिळते. त्यामुळे आता संगीत ऐकताना कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही आणि तुम्ही तासनतास तुमची आवडती गाणी किंवा आवडत्या व्यक्तीसोबत गप्पा मारू शकता.
Boat Rockerz 255 Pro+ वायरलेस ईयरफोन्सच्या किंमतीविषयी बोलायचे झाले तर, याची किंमत 1,499 रुपये इतकी आहे. ऑनलाईन शॉपिंग साइट Amazon वर हा ईयरफोन खरेदी करु शकता. हा वायरलेस ईयरफोन 3 रंगात उपलब्ध आहे. एक्टिव ब्लॅक, नेवी ब्लू आणि टील ग्रीन. हा नेकबँड स्टाइल वायरलेस ईयरफोन आहे. या विभागातील अन्य ब्रँडच्या ईयरफोन्सला Boat चा हा ईयरफोन तगडी टक्कर देणार आहे.
ग्राहकांना या ईयरफोन्समध्ये प्रीमियम फिचर्स मिळतील. हा वॉटर रेसिस्टेंड असून IPX7 रेटिंग प्रमाणित आहे. हा क्वालकॉम aptX ब्लूटुथ कोडेक सपोर्टसह येतो. या ईयरफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटुथ 5 सह क्वालकॉम चिपसेट देण्यात आले आहे. या हेडसेटमध्ये दोन प्रमुख क्वालकॉम टेक्नोलॉजी आहे, ज्यात हाय रिजोल्युशन ऑडिओ ट्रान्समिशनसाठी aptX ब्लूटुथ कोडेक सपोर्ट आणि कॉलदरम्यान उत्कृष्ट असा आवाजाची गुणवत्ता आणि क्वालकॉम cVc Environment नॉईस कॅन्सिलेशन मिळेल.
चार्जिंगसाठी या ईयरफोनमध्ये युएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आले आहे. हा डिवाईस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. हा डिवाईस 10 मिनिट चार्ज केल्यास 10 तासांचा प्लेबॅक टाईम देईल. पूर्ण चार्ज केल्यास यात 40 तासांची बॅटरी लाईफ मिळते.
Boat Rockerz 255 Pro+ वायरलेस ईयरफोनमध्ये 10mm डायनॅमिक ड्राइवर्स आहेत आणि क्वालकॉम aptX शिवाय SBC आणि AAC ब्लूटुथ कोडेक्सला सुद्धा सपोर्ट करतो.