10,000 किंमतीत येणारे भारतातील हे 5 स्मार्टफोन्स आहेत कॅमे-याच्या बाबतीत अव्वल

उत्कृष्ट कॅमेरा फिचर्स असणारे १०००० च्या किंमतीतील ५ जबरदस्त स्मार्टफोन्स

Realme 3 (Photo Credits: Realme)

सध्याचे सेल्फी, व्हिडियो काढण्याचे फॅड लक्षात घेता भारतीय बाजारात रोज नवनवीन  स्मार्टफोन्स येतच असतात. त्यामुळे नेमका कोणता स्मार्टफोन घ्यावा हा एक मोठा प्रश्न ग्राहकांना पडलेला असतो.  त्यात ग्राहकांचा कल असतो तो कमी किंमतीत उत्कृष्ट कॅमेरा फिचर्स देणा-या स्मार्टफोन्सकडे... म्हणून आज आम्ही सांगणार आहोत  10000 च्या किंमतीत येणारे भारतातील 5 उत्कृष्ट स्मार्टफोन्स...

1. सॅमसंग गॅलक्सी M10 (Samsung galaxy M10)

ह्या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.22 इंचाचा असून, ह्याच्या मागील बाजूस 13मेगापिक्सेल आणि 5 मेगापिक्सेलचा ड्यूल कॅमेरा देण्यात आला आहे. तर पुढील बाजूस 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ह्या स्मार्टफोनची 3400mAh इतकी बॅटरी क्षमता आहे. ह्याच्या 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 7,990 रुपये असून 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 8,990 रुपये इतकी आहे.

2. शाओमी रेडमी नोट 7 (xiaomi redmi note 7)

ह्या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.3 इंचाचा असून, ह्यात १३ मेगापिक्सेल आणि २ मेगापिक्सेलचा ड्यूल कॅमेरा देण्यात आला असून, १३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ह्या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 4000Ah इतकी आहे. 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज असलेल्या ह्या स्मार्टफोनची किंमत ९९९९ रुपये इतकी आहे

3. रियलमि 3(Realme 3)

ह्या स्मार्टफोनचा डिस्प्ले ६.२२ इंचाचा असून ह्यात १३ मेगापिक्सेल आणि २ मेगापिक्सेलचा ड्यूल कॅमेरा देण्यात आला असून, १३ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. ह्या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 4230mAh इतकी आहे. 3GB रॅम असलेल्या ह्या स्मार्टफोनची किंमत ८,९९९ रुपये इतकी आहे.

4.  रियलमि सी १ (Realme C1)

ह्या स्मार्टफोनचा डिस्प्ले ६.२ इंचाचा असून ह्यात १३ मेगापिक्सेल आणि २ मेगापिक्सेलचा ड्यूल कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ह्या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 4230mAh इतकी आहे. ह्यात 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत ७,४९९ रुपये इतकी असून 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत ८,४९९ रुपये इतकी आहे.

5. नोकिया 3.1 प्लस (Nokia 3.1 Plus)

ह्या स्मार्टफोनचा डिस्प्ले ६ इंचाचा असून ह्यात १३ मेगापिक्सेल आणि ५ मेगापिक्सेलचा ड्यूल कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. ह्या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 3500mAh इतकी आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत ८,८९० रुपये इतकी आहे.

तुमच्या बजेटमध्ये येणारे हे स्मार्टफोन्स केवळ कॅमे-याच्या बाबतीत अव्वल नसून बॅटरी क्षमतेच्या बाबतीतही तितकेच दमदार आहेत. त्यामुळे तुमच्या बजेटमध्ये येणा-या ह्या स्मार्टफोनचा विचार करायला काही हरकत नाही.