Best Apps For Video Editing: स्मार्टफोनवर व्हिडिओ एडिटिंगसाठी गुगल प्ले स्टोरवर आहेत 'हे' 5 भन्नाट अॅप्स
यात तुम्हाला अनेक एडिटिंग फिचर्स मिळतील.
सध्या अनेकांना फावल्या वेळेत वा विरंगुळा म्हणून स्वत:चे, आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत व्हिडिओ (Video Making) बनविण्याचे फॅड प्रचंड वाढलेले आहे. मात्र ते व्हिडिओ नुसते न बनवता त्यांना छान एडिट करुन मस्त इफेक्ट देणे (Video Editing Effects) हे महत्त्वाचे कामही अनेकांना आवडते. काही स्मार्टफोन्समध्ये व्हिडिओ एडिटिंगचे फंक्शन आधीच असतात. तर काहींना ते शोधावे लागतात. त्यासाठी त्यांची गुगल प्ले स्टोर वर चांगल्या व्हिडिओ एडिटिंग अॅप्ससाठी (Video Editing Apps) शोधाशोध सुरु होते. मात्र गुगल प्ले स्टोर (Google Play Store) वर एडिटिंगचे इतके पर्याय उपलब्ध असतात की लोकांना कोणता अॅप निवडावा याबाबत गोंधळ उडतो.
त्यामुळे तुम्ही बनवलेल्या व्हिडिओला तुमच्या मनासारखे इफेक्ट देण्यासाठी खाली दिलेले पर्याय तुम्ही नक्की वापरू शकता. यात तुम्हाला अनेक एडिटिंग फिचर्स मिळतील.
1. InShot
यामध्ये तुम्हाला स्क्रीन रोटेट, वेगवेगळे इफेक्ट, व्हिडिओ ट्रीम करता येईल. अनावश्यक भाग काढून तो Blur करण्यापर्यंत अनेक इफेक्ट तुम्हाला यात मिळतील.
2. Movie Maker Filmmaker
येथे तुम्हाला मोफत व्हिडिओ एडिटिंग आणि मेकिंग करता येईल. तसे ते कसे करायचे याबाबत मार्गदर्शन देखील मिळेल. येथे तुम्हाला व्हिडिओसाठी Templates सुद्धा मिळतील. यात Shake Video Effect, lumafx यांसारखे इफेक्टसुद्धा वापरता येतील.
3. Power Director
यामध्ये तुम्हाला प्रीमियर कटेंटसाठी कलर फिल्टर्स, टायटल्स इफेक्ट्स, ट्रान्ससिशन सारखे इफेक्ट देता येतील. हा Ad-Free अॅप आहे.
4. YouCut
येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये म्यूजिक, टेक्स्ट, फिल्टर्स, ग्लिटर्स इफेक्ट देता येतील. त्याशिवाय व्हिडिओला फ्लिक, रोटेट करता येईल. बॅकग्राउंड कलर इफेक्ट बदलता येईल.
5. KineMaster
येथे तुम्ही व्हिडिओ व्हॉईस ओव्हर, म्युजिक देऊ शकता. तसेच बॅकग्राउंड इफेक्ट, स्पीड नियंत्रित करणारे स्लो मोशन इफेक्ट सुद्धा देता येतील.
या व्हिडिओ अॅप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्हिडिओला जबरदस्त इफेक्ट देऊ शकता. कुणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, रोमँटिंक मेसेज, मजेशीर संदेश पाठवायचा असेल तर तुमचे व्हिडिओ बनवून त्यावर हे इफेक्ट्स नक्की ट्राय करा.