Battlegrounds Mobile India गेम अखेर लॉन्च; जाणून घ्या कसा कराल डाऊनलोड
पबजीचे इंडियन व्हर्जन बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया आज अखेर लॉन्च झाले आहे. पबजी भारतात बॅन झाल्यानंतर बॅटल रॉयल गेमची घोषणा Krafton ने काही महिन्यांपूर्वी केली.
पबजीचे इंडियन व्हर्जन (PUBG Indian Version) बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया (Battlegrounds Mobile India) आज अखेर लॉन्च झाले आहे. पबजी भारतात बॅन झाल्यानंतर बॅटल रॉयल गेमची घोषणा Krafton ने काही महिन्यांपूर्वी केली. प्री-रजिस्ट्रेशन केलेल्या युजर्सांना या गेमच्या सुरुवातीच्या व्हर्जनचा अॅक्सेस मागील महिन्यांत मिळाला होता. कंपनीने आता बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया गेमचे फायनल व्हर्जन लॉन्च केले आहे.
केवळ गुगल प्ले स्टोअरवरुनच अॅनरॉईड युजर्संना बॅटलग्राऊंड मोबाईल इंडिया गेम डाऊनलोड करता येईल. मात्र iOS युजर्संना हा गेम खेळण्यासाठी अजून काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. जाणून घ्या हा गेम कसा डाऊनलोड कराल?
# अॅनरॉईड स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोअरवर जा.
# Battlegrounds Mobile India असे प्ले स्टोअरच्या सर्चबारमध्ये टाईप करा.
# 'Install' बटणावर क्लिक करा.
गुगल प्ले स्टोअरवरुन प्री-रजिस्ट्रर्ट युजर्स त्यांचे अॅप अपडेट करु शकतात. त्यात त्यांना गेमचे फायनल आणि अधिकृत व्हर्जन मिळेल. (Battlegrounds Mobile India गेम खेळण्यासाठी 'या' मोबाईल स्पेसिफिकेशन्सची गरज; जाणून घ्या सविस्तर)
प्री-रजिस्टर्ट युजर्संना 4 अमेझिंग रिवॉर्ड्स मिळतील. Recon Mask, the Recon Outfit, Celebration Expert Title आणि 300 AG असे हे रिव्हार्ड्स असतील. या गेमचा आनंद घेण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये अॅनरॉईड 5.1.1 आणि त्यावरील ऑपरेटिंग सिस्टम त्यासोबतच कमीत कमी 2GB रॅम असणे आवश्यक आहे. तसंच गेम डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेट कनेक्टीव्हीटी देखील उत्तम असणे गरजेचे आहे. दरम्यान, लॉन्च होताच हा गेम लोकप्रिय ठरत आहे. आतापर्यंत 10 मिलियनहून अधिक युजर्सने हा गेम डाऊनलोड केला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)