Airtel वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी; 11 सर्कलमध्ये बंद झाली 3G सर्व्हिस
आता कंपनीने 11 सर्कलमधील आपली 3 जी (3G) सेवा बंद केली आहे
नुकतेच टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलला (Bharti Airtel) गेल्या तिमाहीमध्ये, तब्बल 1000 कोटींचे नुकसान झाल्याची बातमी आली होती. आता कंपनीने 11 सर्कलमधील आपली 3 जी (3G) सेवा बंद केली आहे. मार्चपर्यंत स्पेक्ट्रमला चालना देण्यासाठी आणि आपल्या 4 जी नेटवर्कमध्ये सुधारणा करण्यासाठी कंपनीने, हे पाऊल उचलले आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत एअरटेलला आपल्या वापरकर्त्यांना उच्च-स्पीड इंटरनेट उपलब्ध करुन द्यायचे आहे. ऑगस्ट 2019 ते मार्च 2020 पर्यंत कंपनीने देशभरातील 22 सर्कलमधील 3 जी नेटवर्क बंद करण्याची घोषणा केली होती.
गेल्या वर्षी जुलैमध्ये कोलकाता, हरियाणा आणि पंजाब सर्कलमधील 3G जी सेवा बंद करून ही प्रक्रिया सुरू झाली. या महिन्याच्या सुरुवातीस, कंपनीने आपल्या 11 सर्कलमध्ये 3 जी सेवा बंद केली. कंपनीचे सीईओ गोपाल विठ्ठल यांनी 11 सर्कलमध्ये 3 जी सेवा बंद केल्याचे गुंतवणूकदारांना सांगितले. आता कंपनीचे सर्व 2100 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम मार्चपर्यंत 4 जी नेटवर्कमध्ये सुधारित होईल.
(हेही वाचा: Bharti Airtel ला तिसऱ्या तिमाहीत तब्बल 1,035 कोटींचे नुकसान; 14 वर्षांतील कंपनीचा सर्वात जास्त तोटा)
VoLTE ला व्हॉईस ओव्हर लाँग-टर्म इव्होल्यूशन म्हणतात. सध्या फक्त टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच आपल्या वापरकर्त्यांना पूर्णपणे 4 जी-व्हीओएलटीई प्रदान करत आहे. त्यानंतर ते 2 जी आणि 4 जीवर लक्ष केंद्रित करेल. व्होडाफोन-आयडियाबद्दल बोलायचे तर, हे 2 जी, 3 जी आणि 4 जी वर कार्यरत आहे. भारती एअरटेलला आता देशभरात आपली 4 जी सेवा द्यायची आहे. कंपनीकडे डिसेंबर 2019 अखेरपर्यंत 1.79 लाख मोबाइल ब्रॉडबँड टॉवर्स होते, जे सप्टेंबर 2019 अखेर 1.81 लाख झाले. आता कंपनी पुढील वर्षी टॉवर्स वाढविण्याच्या विचारात आहोत. हे मुख्यतः ग्रामीण भागात स्थापित केले जातील, जेणेकरून तेथे 4 जी सेवा उपलब्ध होईल.