भारतीय बाजारात लवकरच Asus Zenfone 8 ची सीरिज होणार लॉन्च, ग्राहकांना मिळणार धमाकेदार फिचर्स

असुस इंडियाचे कार्यकारी दिनेश शर्मा यांनी असे म्हटले आहे की, नवी झेनफोन 8 सीरिज लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होईल.

Asus Zenfone 8 (Photo Credits-Twitter)

असुस (Asus) कंपनी भारतात आपली सर्वाधिक लोकप्रिय Asus Zenfone 8 सीरिज लवकरच लॉन्च करणार आहे. असुस इंडियाचे कार्यकारी दिनेश शर्मा यांनी असे म्हटले आहे की, नवी झेनफोन 8 सीरिज लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होईल. पण त्याच्या लॉन्चिंग तारखेबद्दल अधिक खुलासा केलेला नाही. तर कंपनीची ही सीरिज 8 मे रोजी असुस इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर दिसून आला होता. पण तेव्हा तो भारतात उतरवला नव्हता.(Samsung Galaxy M02s, Galaxy A12 आणि Galaxy F02s च्या किंमतीत वाढ; जाणून घ्या नव्या किंमती)

भारतात ही सीरिज कधी लॉन्च केली जाणार याबद्दल सर्वजण विचारत आहे. त्यामुळे टीम याच दिशेने सातत्याने काम करत आहे. आम्ही लवकरच तारीख जाहीर करु असे ही असुसच्या कार्यकारी यांनी म्हटले आहे. त्यांनी याबद्दल ट्विट सुद्धा केले आहे. ट्विटमध्ये एक असुस झेनफोन 8 प्री-सेल पेज संबंधित एक लिंक सुद्धा दिले आहे. ते सुरु केल्यानंतर तुम्हाला Notify Me असे ऑप्शन दाखवले जाणार आहे.

असुस झेनफोन 8 ची जागतिक स्तरावर किंमत EUR 599 (जवळजवळ 53,200 रुपये) पासून सुरु होते. फोनमध्ये 16GB रॅम आणि 256GB पर्यंत 3.1 स्टोरेजसह येणार आहे. स्मार्टफोनमध्ये भारतात याची किंमत वेगळी असण्याची शक्यता आहे. कॉम्पॅक्ट असुस झेनफोन 8 फ्लॅगशिपमध्ये 120Hz रेटसह 5.9 इंचाचा सॅमसंग अमोलेड एचडीार डिस्प्ले आहे. डिवाइस मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट असून जी 16GB पर्यंत रॅमसह येणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. तर 12MP ची अल्ट्रा वाइड लेन्स दिली आहे. तर 12 मेगापिक्सल सेल्फी शूटरसह येणार आहे.

असुस झेनफोन 8 टॉपवर ZenUI 8 सह अॅन्ड्रॉइड 11 वर रन करतो. फोनमध्ये 8 मध्ये 4,000mAh ची बॅटरी मिळणार आहे. हा एक क्विक चार्ज 4.0, पॉवर डिलिव्हरी स्टँडर्डला सपोर्ट करणार आहे. या व्यतिरिक्त फोन मध्ये IP68 वॉटर आणि डस्ट रेजिस्टेंस, एक 3.5mm ऑडिओ जॅक, Dirac HD साउंडसह डुअल स्टिरिओ स्पीकर दिला आहे.