Asus कंपनीकडून 15 फेब्रुवारीला लॉन्च करणार नवे धमाकेदार स्मार्टफोन, जाणून घ्या अधिक
ताइवान स्थित कंपनीने भारतातील असुस इंडियाने याबद्दल घोषणा केली आहे. ऑगस्ट 2021 मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888+ Soc सोबत स्मार्टफोनचे अनावरण केले होते.
Asus ROG Phone 5s आणि Asus ROG Phone 5s Pro भारतात येत्या 15 फेब्रुवारीला लॉन्च केले जाणार आहेत. ताइवान स्थित कंपनीने भारतातील असुस इंडियाने याबद्दल घोषणा केली आहे. ऑगस्ट 2021 मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888+ Soc सोबत स्मार्टफोनचे अनावरण केले होते. आसुस दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा सॅमसंग AMOLED E4 डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट दिला गेला आहे. हा वेनिला ROG फोन 5s 18GB पर्यंत LPDDR5 रॅमसह येणार आहे. तसेच प्रो वेरियंट 18GB LPDDR5 रॅम कॉन्फ्रिगरेशनमध्ये येणार आहेत. परंतु भारतीय वेरियंटच्या स्पेसिफिकेशन बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
कंपनीने Asus ROG Phone 5s आणि Asus ROG Phone 5s Pro हा स्मार्टफोन भारतात 15 फेब्रुवारीला 12 वाजता लॉन्च करणार आहे. कंपनीकडून स्मार्टफोनच्या लॉन्चिंगसंबंधित युट्यूब चॅनलवर लाइव्हस्ट्रिमिंग दाखवले जाणार आहे. असुस फोन संदर्भात अधिक माहिती देण्यात आलेली नाही.(BSNL च्या 'या' प्लॅन्समुळे Jio, Airtel आणि Vodafone-Idea चे टेन्शन वाढले, दररोज 5GB पर्यंत डेटासह मिळणार अनेक फायदे)
जागतिक बाजारात लॉन्च झालेल्या Asus फोनच्या वैशिष्ट्यांनुसार, Asus ROG Phone 5S आणि ROG Phone 5S Pro ROG UI स्कीनसह Android 11 वर चालतात. यामध्ये 6.78-इंच फुल-एचडी + (1,080x2,448 पिक्सेल) Samsung AMOLED E4 डिस्प्ले समाविष्ट आहे, जो कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस संरक्षण आणि 144Hz रिफ्रेश रेटसह येतो. गेल्या वर्षी घोषित केलेले जागतिक मॉडेल, Qualcomm Snapdragon 888+ SoCs द्वारे समर्थित आहेत, 18GB LPDDR5 RAM आणि 512GB ऑनबोर्ड स्टोरेज पर्यायांसह जोडलेले आहेत.
Asus ROG Phone 5s आणि ROG Phone 5s Pro स्पोर्ट ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप. कॅमेरा मॉड्यूलमध्ये 64-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, 13-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-एंगल सेन्सर आणि 5-मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर समाविष्ट आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी दोन्ही फोनमध्ये 24-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे.
दोन्ही स्मार्टफोन्स 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी पॅकसह येतात. ड्युअल फ्रंट-फेसिंग स्टीरिओ स्पीकर देखील आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी, प्रत्येक फोनमध्ये 5G, 4G LTE सपोर्ट, वाय-फाय, ब्लूटूथ v5.2, NFC, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि USB टाइप-सी पोर्ट आहे.