Apple कंपनी लवकरच घेऊन येणार ट्रिपल कॅमेरा असलेला iPhone?
जगप्रसिद्ध अॅपल (Apple) कंपनी लवरच यंदाच्या वर्षात iPhone मध्ये ट्रिपल कॅमरा असणारा फोन लाँन्च करणार आहे.
जगप्रसिद्ध अॅपल (Apple) कंपनी लवरच यंदाच्या वर्षात iPhone मध्ये ट्रिपल कॅमरा असणारा फोन लाँन्च करणार आहे. तसेच LCD पद्धतीने हे नवीन मॉडेल बनविण्यात येणार आहे. याबाबतचा खुलासा वॉल स्ट्रिट जर्नलमध्ये करण्यात आला आहे. या जर्नलच्या अनुसार, iPhone XR ची विक्री कमी झाली असली तरीही अॅपल कंपनी LCD iPhone आणि दोन नवीन प्रिमियम मॉडेल लकरच घेऊन येणार आहे. तसेच नव्या आयफोनच्या मॉडेलची किंमत iPhone XS पेक्षा जास्त असणार आहे.
आपल्या प्रतिस्पर्धकांना टक्कर देण्यासाठी अॅपल कंपनी सर्वात प्रथम त्याचा प्रिमियम मॉडेलमधील ट्रिपल कॅमेराचे सेटअप सध्या करत आहे. हे नवं मॉडेल iPhone, iPhone XS Max यांची जागा घेणार आहे. तसेच LCD चे पद्धतीचे तंत्रज्ञान वापरुन या नव्या स्मार्टफोनची रचना करण्यात येणार आहे.
रिपोर्ट्सनुसार अॅपल कंपनी 2020 मध्ये LCD ऑप्शन काढून टाकणार आहे. तर फक्त OLED-Only पद्धतीचे स्मार्टफोन अॅपल कंपनी घेऊन येणार आहे. तसेच OLED टेक्नॉलॉजी ही स्मार्टफोनमधील फंक्शन्स उत्तम प्रकारे चालण्यास मदत करणार आहे. तर कॅमेऱ्यामध्ये Long Distance Time Of Flight हे नवं फीचर्स आणणार आहे.