iPhone SE 2022: Apple ने भारतात लॉन्च केला सर्वात स्वस्त आयफोन; किंमत Rs 43,900 पासून सुरू, पहा कधी करू शकाल ऑर्डर
आयफोन एसई ची भारतात प्री ऑर्डर 11 मार्च 2022 पासून सुरू होत आहे तर 18 मार्च 2022 पासून हा फोन उपलब्ध होणार आहे.
अॅपल (Apple) कडून यंदाच्या वर्षातला पहिलाच सर्वात स्वस्त आयफोन (iphone) लॉन्च करण्यात आला आहे. iPhone SE हा तो स्मार्टफोन आहे. यापूर्वी 2020 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या मॉडेलचेच हे डिझाईन आहे. दरम्यान या फोनमध्ये iPhone 13 series चाच प्रोसेसर वापरण्यात आला आहे. काल पार पडलेल्या अॅपलच्या इव्हेंट मध्ये iPhone SE सह आयपॅड, आणि iphone 13 नवीन रंगात लाँच करण्यात आला आहे. Peek Performance नावाने यंदाचा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता.
iPhone SE हा तीन मॉडेल्स अर्थात 64GB, 128GB, आणि 256GB मध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच मिडनाईट, स्टारलाईट आणि प्रोडक्ट रेड असे तीन रंग उपलब्ध असणार आहेत. या मोबाईलची किंमत 43900 पासून सुरू होणार आहे. भारतातील ग्राहकांना या स्मार्टफोनसाठी प्री ऑर्डर 11 मार्च 2022 पासून सुरू होत आहे तर 18 मार्च 2022 पासून हा फोन उपलब्ध होणार आहे. हे देखील नक्की वाचा: International Women's Day 2022: फक्त महिलांसाठी लॉन्च झाला 'हा' स्मार्टफोन; फीचर्स जाणून तुम्हीही व्हाल हैराण .
iPhone SE स्पेसिफिकेशन
iPhone SE (2022) हा iOS 15 वर चालणार आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार यामध्ये सर्वात मजबूत काच वापरण्यात आली आहे. 138.4×67.3×7.3mm आकाराचा हा स्मार्टफोन 144 ग्रॅम वजनाचा आहे.
iPhone SE मध्ये स्मार्ट HDR 4, फोटोग्राफिक स्टाइल्स, डीप फ्यूजन आणि पोर्ट्रेट मोडसह 12-मेगापिक्सेल ƒ/1.8 अपर्चर वाइड कॅमेरा, A15 Bionic द्वारे सर्व-नवीन कॅमेरा सिस्टम आहेत. 4 iPhone 13 Pro आणि iPhone 13 सह सादर केले आहे. , स्मार्ट HDR 4 पार्श्वभूमी विरुद्ध विषयावर रंग, कॉन्ट्रास्ट आणि आवाज यासाठी इंटेलिजेंट सेगमेंटेशन वापरते.
iPhone SE 2022 5G सह iPhone SE वर येणार आहे. यामध्ये नवीन वायरलेस तंत्रज्ञानाचा फायदा घेता येणार आहे. जलद अपलोड आणि डाउनलोड, कमी विलंबता आणि अधिक ठिकाणी चांगले अनुभव घेण्यास अनुमती देते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)