Apple Jobs: ॲपल भारतामध्ये करणार बंपर नोकर भरती; पुढील तीन वर्षात पाच लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता

2023-24 या आर्थिक वर्षात ते $12.1 बिलियनवर पोहोचले, जे 2022-23 या आर्थिक वर्षात $6.27 अब्ज होते. म्हणजे यामध्ये जवळपास 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Apple (Apple / Twitter)

Apple May Employ Over 5 Lakh People In India: आयफोन बनवणारी अमेरिकन कंपनी ॲपल (Apple) भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. ही तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी पुढील तीन वर्षांत भारतातील पाच लाखांहून अधिक लोकांना आपल्या विक्रेत्यांमार्फत रोजगार देऊ शकते. पीटीआय या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. सध्या भारतात ॲपलचे विक्रेते आणि पुरवठादार 1.5 लाख लोकांना रोजगार देतात. यामध्ये सर्वात मोठा रोजगार देणारा टाटा इलेक्ट्रॉनिक्स आहे, जो ॲपलचे दोन प्लांट चालवतो.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'ॲपल भारतात नोकर भरती वाढवत आहे. आमचा अंदाज असा आहे की पुढील तीन वर्षांत ते विक्रेते आणि घटक पुरवठादारांद्वारे 5 लाख लोकांना रोजगार देणार आहे.’ मात्र, ॲपलने यासंदर्भात पीटीआयच्या प्रश्नांना उत्तर दिले नाही.

ॲपलने येत्या पाच वर्षांत भारतात आपले उत्पादन पाच पटीने वाढवून 3.32 लाख कोटी रुपये करण्याचा विचार केला आहे. मार्केट रिसर्च फर्म काउंटरपॉईंट रिसर्चच्या मते, ॲपल 2023 मध्ये पहिल्यांदा कमाईच्या बाबतीत भारतीय बाजारपेठेत अव्वल स्थानावर आहे. त्याच वेळी, व्हॉल्यूम विक्रीच्या बाबतीत दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग अव्वल आहे. काउंटरपॉईंट रिसर्चने आपल्या अलीकडील अहवालात म्हटले आहे की, ॲपलने भारतातून 10 दशलक्ष युनिट शिपमेंटचा विक्रम केला आणि एका कॅलेंडर वर्षात कमाईच्या बाबतीत प्रथमच पहिल्या स्थानावर राहिली. (हेही वाचा: LinkedIn Top 25 Companies in India: लिंक्डइनने जारी केली यंदाची देशातील 25 सर्वोत्तम कंपन्यांची यादी; भारतात काम करण्यासाठी TCS सर्वात उत्तम)

ट्रेड इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म द ट्रेड व्हिजननुसार, ॲपलची भारतातून आयफोनची निर्यातही वेगाने वाढली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात ते $12.1 बिलियनवर पोहोचले, जे 2022-23 या आर्थिक वर्षात $6.27 अब्ज होते. म्हणजे यामध्ये जवळपास 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, याआधी न्यूज एजन्सी आयएएनएसने अलीकडेच एका अहवालाचा हवाला देऊन दावा केला आहे की, ॲपल चीनवरील आपले अवलंबित्व कमी करत आहे आणि भारतात गुंतवणूक वाढवत आहे. कंपनी फोन कॅमेरा मॉड्यूल्ससाठी टाटा समूहाशी चर्चा करत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif