Apple iOS 18 Release Date: आयफोन 16 सिरीजनंतर आता समोर आली ॲपल आयओएस 18 ची रिलीज डेट; जाणून घ्या कधी व कोणत्या युजर्ससाठी होणार उपलब्ध
कंपनी आपल्या ऑपरेटिंग सिस्टमच्या नवीन आवृत्तीसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाही.
Apple iOS 18 Release Date: ॲपलने (Apple) काल आपल्या वार्षिक कार्यक्रमात बहुप्रतीक्षित आयफोन 16 सिरीज सादर केली. या सिरीजमधील आयफोन 16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स असे चारही फोन भारतात लॉन्च करण्यात आले आहेत. नवीन आयफोन्ससोबत कंपनीने आयओएस 18 (iOS 18) ची देखील घोषणा केली आहे. ॲपलची ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम येत्या 16 सप्टेंबर रोजी रिलीज होईल. त्यानंतर ॲपल वापरकर्ते त्यांच्या आयफोनमध्ये ती डाउनलोड आणि स्थापित करू शकतील. ॲपलने असेही घोषित केले आहे की, macOS Sequoia, watchOS 11 आणि visionOS 2 देखील 16 सप्टेंबर रोजी आणले जातील.
ॲपल आयफोन वापरकर्ते नवीन आयओएस 18 पूर्णपणे मोफत वापरण्यास सक्षम असतील. कंपनी आपल्या ऑपरेटिंग सिस्टमच्या नवीन आवृत्तीसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाही. आयओएस 18 हे एक मोफत सॉफ्टवेअर अपडेट आहे, जे कंपनीच्या सर्व पात्र वापरकर्त्यांना मिळेल.
या उपकरणांमध्ये आयओएस 18 सपोर्ट उपलब्ध असेल-
iPhone XR
iPhone XS
iPhone XS Max
iPhone 11
iPhone 11 Pro
iPhone 11 Pro Max
iPhone 12
iPhone 12 Mini
iPhone 12 Pro
iPhone 12 Pro Max
iPhone 13
iPhone 13 Pro
iPhone 13 Pro Max
iPhone 14
iPhone 14 Pro
iPhone 14 Plus
iPhone 14 Pro Max
iPhone 15
iPhone 15 pro
iPhone 15 Pro Max
iPhone SE 3rd gen
iPhone SE 2nd Gen
पुगोपनीयता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आयओएस 18 पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित करण्यात आला आहे. डेटा लीक आणि फोन हॅकिंगसारख्या समस्या टाळण्यासाठी फोनमध्ये फॅक्टर ऑथेंटिकेशन असेल. यासह इतरही अनेक फीचर्स यामध्ये जोडण्यात आली आहेत. पुढील आठवड्यापासून यूजर्स त्यांचे फोन अपडेट करून नवीन फीचर्सचा अनुभव घेऊ शकतील.