Apple Event 2022: बहुप्रतीक्षित iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max सह अनेक डिव्हाइस लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
कंपनीने नवीन Apple Airpods Pro 2 ची किंमत $249 निश्चित केली आहे. हे Apple इयरबड्स 9 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डर बुकिंगसाठी उपलब्ध केले जातील आणि 23 सप्टेंबरपासून विक्री सुरू होईल.
आज अॅपलचा (Apple) बहुप्रतीक्षित इव्हेंट पार पडला. Apple ने त्याच्या क्युपर्टिनो-कॅम्पसमध्ये फार आऊट इव्हेंट आयोजित केला होता. आजच्या कार्यक्रमात नवीन आयफोन मॉडेल्स, नवीन अॅपल वॉच आणि नवीन अॅपल एअरबड्स लॉन्च केले गेले. अॅपल इव्हेंटची सुरुवात अॅपल वॉचच्या (Apple Watch Series 8) लॉन्चसह झाली. हे घड्याळ स्विम प्रूफ, डस्ट प्रूफ आणि रेझिस्टन्स प्रूफ यांसारख्या फीचर्सनी परिपूर्ण आहे. याशिवाय, यामध्ये तुम्हाला टेम्परेचर सेन्सर्स मिळतील, तसेच हे घड्याळ तुम्हाला पीरियड्सची माहिती आणि फिमेल ओव्हुलेशनची माहिती देण्यात मदत करेल.
बॅटरीबाबत कंपनीचा दावा आहे की हे घड्याळ 36 तास चालेल. यासोबतच इंटरनॅशनल रोमिंगचाही सपोर्ट याला मिळणार आहे. याच्या GPS व्हर्जनची किंमत $399 पासून सुरू होईल, तर सेल्युलर व्हर्जनची किंमत $499 पासून सुरू होईल. आजपासून, हे नवीनतम घड्याळ प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध केले जाईल, परंतु विक्री 16 सप्टेंबरपासून सुरू होईल.
आजच्या इव्हेंटमध्ये नवीन ऍपल वॉच एसई 2022 (Apple Watch SE 2022) व्हर्जन नवीन रंगांसह आणि बॅककेस डिझाइनसह सादर करण्यात आले. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, GPS आवृत्तीची किंमत $249 आणि सेल्युलर आवृत्तीची किंमत $299 निश्चित करण्यात आली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Apple Watch SE 2022 ची विक्री 16 सप्टेंबरपासून सुरू होईल. नवीन ऍपल वॉचमध्ये इतके उच्च तंत्रज्ञान आहे, की त्यात उपस्थित असलेल्या नवीन सेन्सरच्या मदतीने वापरकर्ते डायव्हिंग दरम्यान पाण्याचे तापमान आणि पाण्याची खोली इत्यादी तपासू शकतात.
आज कंपनीने Apple Watch Ultra एका खास केससह लॉन्च केले. यामध्ये 49mm केस मोठ्या डिस्प्लेसह देण्यात आला आहे. याशिवाय, एक अॅक्शन बटण देखील स्वतंत्रपणे उपलब्ध असेल. आवाज वाढवण्यासाठी दोन स्पीकर देण्यात आले आहेत. या घड्याळाचा प्रत्येक प्रकार सेल्युलरला सपोर्ट करतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना या घड्याळासह 36 तासांचा बॅकअप मिळेल. कंपनीने Apple Watch Ultra ची सुरुवातीची किंमत $799 निश्चित केली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या घड्याळाची विक्री 23 सप्टेंबरपासून सुरू होईल.
आज Apple AirPods Pro 2 देखील सादर करण्यात आले. कंपनीने नवीन Apple Airpods Pro 2 ची किंमत $249 निश्चित केली आहे. हे Apple इयरबड्स 9 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डर बुकिंगसाठी उपलब्ध केले जातील आणि 23 सप्टेंबरपासून विक्री सुरू होईल.
शेवटी सर्वांना उत्सुकता असलेली iPhone 14 ची सीरीज सादर करण्यात आली. या सीरीज अंतर्गत लॉन्च केलेल्या iPhone 14 Plus मध्ये 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले आहे, तर iPhone 14 मध्ये 6.1-इंच स्क्रीन आहे. या दोन्ही मॉडेल्सची बॅटरी एक दिवस चालू शकेल. दोन्ही फोन्स मध्ये A15 बायोनिक चिपसेटचे अपडेटेड व्हर्जन देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे iPhone 14, iPhone 14 Plus US मॉडेल्समध्ये सिम कार्ड स्लॉट नाही. यामध्ये ई-सीम कार्ड वापरले जाणार आहे. (हेही वाचा: WhatsApp 24 ऑक्टोबर पासून 'या' iPhones ला नाही करणार सपोर्ट)
वॉच सिरीज 8 प्रमाणे Apple iPhone 14 आणि iPhone 14 Plus मध्ये क्रॅश डिटेक्शन उपलब्ध आहे. कंपनी सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीद्वारे iPhone 14 सिरीजमध्ये आपत्कालीन SOS क्षमता जोडत आहे. हे फिचर iPhone 14 आणि iPhone 14 Plus या दोन्हींमध्ये उपलब्ध असेल. सध्या, iPhone 14, iPhone 14 Plus मधील सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फिचर यूएस आणि कॅनडाच्या बाजारपेठेपुरते मर्यादित असेल. आयफोनसह अॅपल ही सेवा पहिली दोन वर्षे मोफत देत आहे. तुम्हाला iPhone 14 आणि iPhone 14 Plus मध्ये 12 मेगापिक्सेलचे दोनच कॅमेरा सेन्सर पाहायला मिळतील.
Apple iPhone 14 ची किंमत $799 पासून सुरू होते, प्री-ऑर्डर बुकिंग 9 सप्टेंबरपासून सुरू होईल. सेलच्या तारखेबद्दल बोलायचे झाले तर iPhone 14 ची विक्री 16 सप्टेंबरपासून सुरू होईल. iPhone 14 Plus ची किंमत $899 आहे. आयफोन 14 पाच रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे.
Apple ने आज Apple iPhone 14 Pro आणि Apple iPhone 14 Pro Max देखील सादर केले. आयफोन 14 प्रो मॉडेल्समध्ये A16 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे. ऍपलचा दावा आहे की हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली चिपसेट आहे. iPhone 14 Pro मध्ये 48MP मुख्य कॅमेरा आहे. iPhone 14 Pro ची किंमत $999 आणि iPhone 14 Pro Max ची किंमत $1099 पासून सुरू होते. या फोन्सची विक्रीदेखील 16 सप्टेंबरपासून सुरू होईल.