Apple Days Sale: आता अॅमेझॉनवर स्वस्तात खरेदी करू शकता iPhone 12 Mini; जाणून घ्या जबरदस्त डिस्काऊंट ऑफर्स

आज, iPhone 12 Mini पहिल्या दिवसाच्या विक्रीत सर्वोत्तम डीलमध्ये उपलब्ध आहे.

Apple iPhone (Photo Credits: Twitter)

Apple Days Sale: आपण नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असल्यास आपल्यासाठी ही चांगली संधी असू शकते. कारण ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन इंडियावर आजपासून अर्थात 12 मार्चपासून Apple Days Sale ची विक्री असून ही विक्री 17 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये Apple च्या सर्व उपकरणांवर उत्तम ऑफर दिल्या जात आहेत. या विक्रीमध्ये आयफोनवर सवलत, एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयदेखील देण्यात येत आहे. आज, iPhone 12 Mini पहिल्या दिवसाच्या विक्रीत सर्वोत्तम डीलमध्ये उपलब्ध आहे. चला तर मग iPhone 12 Mini वरील सूट आणि ऑफरबद्दल अधिक जाणून घेऊयात...

Apple डेज सेलमध्ये आयफोनवर असलेल्या ऑफर्समध्ये कॉस्ट ईएमआय पर्याय आणि एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. याशिवाय तुमच्याकडे एचडीएफसी बँक कार्ड असल्यास तुम्हाला थेट 6,000 रुपयांची त्वरित सूट मिळू शकते. (वाचा - Samsung Galaxy M02 स्मार्टफोन महागला, काय आहे नवी किंमत?)

iPhone 12 Mini वर मोठी सूट -

iPhone 12 Mini हे डिव्हाइस गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच भारतीय बाजारात उपलब्ध झाले होते. त्याची मूळ किंमत 69,900 रुपये आहे. Apple डेज सेलमध्ये या स्मार्टफोनवर 2,890 रुपयांची सूट देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही हा फोन 67,100 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. जर तुमच्याकडे एचडीएफस बँक कार्ड असेल तर तुम्हाला त्वरित सूटदेखील मिळू शकते. त्यानंतर तुम्ही हा फोन 61,100 रुपयांना खरेदी करू शकता.

iPhone 12 Mini स्पेसिफिकेशन्स -

iPhone 12 Mini मध्ये ड्युअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. ज्यामध्ये यूजर्स नॅनो आणि ई-सिम वापरू शकतात. iOS 14 ओएस वर आधारित, हे डिव्हाइस A14 Bionic chip वर कार्य करते. iPhone 12 Mini मध्ये 5.4 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 12 एमपी वाइड एंगल लेन्स आणि अल्ट्रा वाइड एंगल शूटरचा समावेश आहे. यासह, डिव्हाइसमध्ये MagSafe वायरलेस चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल.