Apple कंपनी देतेय Apple TV Plus चे फ्री सब्सक्रिप्शन, फेब्रुवारी 2021 पर्यंत लाभ घेता येणार

मात्र ही सर्विस फक्त काही निवडक युजर्ससाठी असणार आहे. अॅपलच्या निवडक युजर्सचा अॅपल टीव्ही प्लस स्ट्रिमिंगची सर्विस येत्या फेब्रुवारी 2021 पर्यत फ्री मध्ये वापरता येणार आहे.

Apple TV+ (Photo Credits-Twitter)

कोरोना व्हायरसच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मचा (OTT Platform) वापर अधिक केला जात आहे. याच कारणास्तव अॅपल (Apple) कंपनीने त्यांची स्ट्रिमिंग सर्विस Apple TV Plus साठी फ्री मध्ये लाभ घेण्याची डेडलाइन वाढवली आहे. मात्र ही सर्विस फक्त काही निवडक युजर्ससाठी असणार आहे. अॅपलच्या निवडक युजर्सचा अॅपल टीव्ही प्लस स्ट्रिमिंगची सर्विस येत्या फेब्रुवारी 2021 पर्यत फ्री मध्ये वापरता येणार आहे. अॅपलकडून Apple TV Plus सर्विसचे फ्री सब्सक्रिप्शन वाढवण्याची घोषणा केली गेली आहे.(Apple कंपनीकडून दिवाळी गिफ्ट ऑफर, iPhone 11 खरेदीवर फ्री मिळणार 'हे' शानदार डिवाइस)

आयफोन निर्माती कंपनी Apple कडून 2019 मध्ये निर्मित Apple प्रोडक्ट्सच्या खरेदीवर Apple TV Plus वर सर्विस फ्री सब्सक्रिप्शन ऑफर केली होती. त्याची मर्यादा येत्या 1 नोव्हेंबरला समाप्त होणार होती. त्याचसोबत नोव्हेंबरच्या एक तारखेला याला एक वर्ष सुद्धा पूर्ण होणार आहे. त्यामुळेच कंपनीने ही सर्विस येत्या फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. TechCrunch च्या रिपोर्टनुसार, वर्षभरासाठी फ्री सब्सक्रिप्शन मिळणारी ही सर्विस फक्त ज्यांनी 31 जानेवारी 2020 पूर्वी Apple TV Plus सब्सक्राइब केले होते.(Amazon Great Indian Festival Sale 2020: खुशखबर! iPhone 11 मिळणार आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीमध्ये; अ‍ॅमेझॉन देत आहे संधी)

ज्या युजर्सनने कोणत्याही Apple डिवाइसच्या खरेदीवर Apple Tv Plus सर्विस 21 जानेवारी 2020 पूर्वी एक्सेस केली आहे त्यांना सुद्धा पुढील तीन महिन्यांसाठी ही सर्विस फ्री मिळणार आहे. Apple TV Plus सर्विस अॅपल टिव्ही अॅपच्या माध्यमातून iPhone, iPad, Apple TV, iPod Touch, Mac वर उपलब्ध असणार आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, Apple TV Plus चे जवळजवळ एक कोटी सब्सक्राइब्सर्स आहेत.