Apple AirPods Max: अॅपल ने लॉन्च केले त्यांचे पहिले Over-Ear Wireless Headphones; पहा फीचर्स, किंमत
स्पेस ग्रे, सिल्व्हर, स्काय ब्लू, ग्रीन, पिंक या 5 रंगात उपलब्ध असतील.
अॅपल (Apple) ने नुकतीच 'एअरपोड्स मॅक्स' (Apple AirPods Max) या नावाने त्यांचे पहिले वायरलेस हेडफोन्स (Over-Ear Wireless Headphones) बाजरात लॉन्च केले आहेत. भारतासह जगभरात 15 डिसेंबरपासून त्याची शिपिंग सुरू असून किंमत 59,900 रूपये असल्याचं जाहीर केले आहे. अमेरिकेसह 25 देशांमध्ये अॅपलचे हे नवे वायरलेस हेडफोन्स उपलब्ध होणार आहेत. Apple India online वर Apple Authorised Resellers कडे हे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. दरम्यान ऑनलाईन जाहीर करण्यात आलेल्या लिस्टिंग प्रमाणे 5 रंगांमध्ये अॅपलचे हे नवे हेडफोन्स उपलब्ध असातील. त्यामध्ये स्पेस ग्रे, सिल्व्हर, स्काय ब्लू, ग्रीन, पिंक हे रंग उपलब्ध असणार आहेत.
'एअरपोड्स मॅक्स' ची फीचर्स काय आहेत?
अॅपलने सादर केलेल्या त्यांच्या पहिल्या वहिल्या ओव्हर इअर हेडफोन्समध्ये high-fidelity audio असेल असा दावा करण्यात आला आहे. स्टेनलेस स्टील हेडबॅन्ड असेल ज्यामुळे डोक्याच्या आकाराप्रमाणे तो अॅडजस्ट होण्यास मदत होणार आहे. इयरकप्स हे “acoustically optimised” असतील त्याला मॅग्निटकली अटॅच्ड कुशन असतील. दरम्यान या मटेरिअलचा वापर केला अअहे त्यामुळे नॉईज कॅन्सलिंग अनुभव उत्तम असेल. या हेडफोनमध्ये ए1 चिप्स, एडेप्टिव्ह इक्यू, अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन, ट्रा न्सपरसी मोड, असेल. एका बटनावर युजर्सना मोड बदलण्याची सुविधा असेल.
एअरपोड्स मॅक्सची बॅटरी लाईफ 20 तासांपर्यंत देण्यात आली आहे. हे हेडफोन्स iOS 14.3 आणि पुढील मॉडेल्समध्ये वापरले जाऊ शकतात. iPadOS 14.किंवा पुढे, macOS Big Sur 11.1 किंवा पुढे watchOS 7.2 किंवा पुढे tvOS 14.3 किंवा पुढे वापरले जाऊ शकतात.
सध्या अॅपलचे उपलब्ध असलेले AirPods हे रूपये 14,900 तर AirPods Pro हे रूपये 24,900 पासून पुढे उपलब्ध आहेत.