Google 3D Animals: 'या' Android आणि iOS स्मार्टफोन मध्ये Panda, Tiger, Lion, Shark, Penguin पाहू शकाल अगदी तुमच्या जवळ!

गुगलने जगभरात होम क्वारंटाईन आणि लॉकडाऊनमुळे एकटे पडलेल्या दिलेल्या नव्या फीचरमध्ये 2 आकर्षणं आहेत. एक म्हणजे तुम्ही अनेक प्राणी, पक्षी 3D मध्ये पाहू शकता आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत फोटोसेशन करू शकता.

Google 3D Animals (Photo Credits: @bw_clark/ @ozzyetomi/ Twitter)

भारतभर लॉकडाऊन असल्याने घरात कंटाळलेल्या अनेकांना Google 3D Animals चा सहारा आहे. गूगलच्या या गंमतीशीर टूलची सध्या सोशल मीडीयामध्ये चलती आहे. घराच्या चार भिंतींमध्ये अडकून राहिलेल्या अनेक चिमुरड्यांना विरंगुळाचा एक पर्याय म्हणून Tiger, Wolf, Panda, Shark, Dog, Cat असे प्राणी आणि अनेक पक्षींसोबत अगदी घरबसल्या फोटोसेशन करून रटाळ झालेला दिवस थोडा इंट्रेसिंग करण्याची सोय आहे. पण गूगलचे हे नवं आणि मजेशीर टूल स्मार्टफोनच्या अ‍ॅन्ड्राईड आणि आयओएसच्या सार्‍याच फोनला सपोर्ट करत नाहीत. जर तुमच्याही फोनमध्ये हा View the animals in 3D चा पर्याय दिसत नसेल तर खाली दिलेल्या पर्यायाचा वापर करून ते फीचर ओपन करण्याची सोय आहे. Google 3D Animals Video Tutorial: 'या' सोप्प्या टिप्स वापरून Tiger, Giant Panda, Lion, Tiger आणि Penguin ला डिजिटली आणा तुमच्या घरी! (Watch Video).

गुगलने जगभरात होम क्वारंटाईन आणि लॉकडाऊनमुळे एकटे पडलेल्या दिलेल्या नव्या फीचरमध्ये 2 आकर्षणं आहेत. एक म्हणजे तुम्ही अनेक प्राणी, पक्षी 3D मध्ये पाहू शकता आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत फोटोसेशन करू शकता. मग गूगलचं हे Google 3D Animals View तुमच्या स्मार्टफोनमध्ये उघडत नसेल तर काय कराल?

Google 3D Animals View चं सेटिंग तुमच्या मोबाईलमध्ये कसं कराल?

सर्वात प्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेटिंग्समध्ये जा. त्यानंतर Apps and Notifications वर क्लिक करा.

त्यानंतर ‘Google’ app सुरू करून ‘Permission' वर क्लिक करा.

त्यानंतर Google View in 3D Feature पाहण्यासाठी तुमच्या आवश्यक वाटत असलेल्या सार्‍या ‘Permission' तुम्ही स्विच ऑन करू शकता.

Google Animals 3D 'View in Your Space' Feature नेमक्या कोणकोणत्या स्मार्टफोनला सपोर्ट करतं?

Manufacturer Models
Google Pixel, Pixel XL, Pixel 2 Series, Pixel 3 Series, Pixel 3a Series, Pixel 4 Series
OnePlus OnePlus 3T, 5, 5T, 6, 6T, 7, 7 Pro, 7T, 7T Pro
Huawei Mate 20 Series, Nova 3, Nova 3i, Nova 4, P20 Series, P30 Series, Y9 (2019)
Oppo F11 Pro, K3 K5, R17 Pro, Reno, Reno 2 Series, Reno Z
Asus Zenfone 6, ROG Phone, ROG Phone 2
Nokia Nokia 6, 6.1, 7.1, 8, 8 Sirocco, 8.1
Honor Honor 8X, 10, View 10, V20
LG G7 ThinQ, G7 ThinQ, Q8, Q70, Q6, V30, V35, V40 ThinQ, V50 ThinQ, V60 ThinQ
Motorola Moto G6 Series, Moto G7 Series, Moto G8 Series, Motorola One, One Action, One Hyper, One Macro, One Power, One Vision, One Zoom, X4, Z2 Force, Moto Z3 Series, Moto Z4
Realme Realme 5 Series, Realme Q, XT, X2, X2 Pro, X Lite,
Samsung Samsung Galaxy A5, Galaxy A6 (2018), Galaxy A7 (2017), Galaxy A7 (2018), Galaxy A8, Galaxy A8+ (2018), Galaxy A30, Galaxy A40, Galaxy A50, Galaxy A50s, Galaxy A60, Galaxy A70, Galaxy A70s, Galaxy A71, Galaxy A80, Galaxy A90 5G, Galaxy Fold, Galaxy M30s, Galaxy Note 8, Galaxy Note 9, Galaxy Note 10 Series, Galaxy S7 Series, Galaxy S8 Series, Galaxy S9 Series, Galaxy S10 Series, Galaxy XCover Pro & Galaxy Z Flip
Sony Xperia XZ1, Xperia XZ2, Xperia XZ2 Premium, Xperia 1, Xperia 5, Xperia XZ2 Compact
Xiaomi Mi 8, Mi 8 SE, Mi 9, Mi 9 SE, Mi A3, Mi Mix 2S, Mi Mix 3, Poco F1, Redmi K20, Redmi K20 Pro, Redmi Note 7, Redmi Note 7 Pro
Vivo Nex 3, Nex S, Nex 3 5G, Nex Dual Display Edition
Apple iPhone SE, 7, 7 Plus, 6S, 6S Plus, iPhone X, XS, XS Max, XR, iPhone 11, 11 Pro, 11 Pro Max

 

काही वेळेस गूगल सर्व्हरवर देखील काही तांत्रिक बिघाड होत असल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामुळे काही जणांना ते लहान मोठे बिघाड दूर होण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. सध्या हे फीचर आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय होत आहे. अनेकांनी प्राण्यांसोबत, पक्षांसोबत फोटो क्लिक करून ते सोशल मीडीयांमध्ये शेअर केल्याने आता जगभरात या नव्या फीचरची उत्सुकता वाढली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now