स्मार्टफोनसाठी Android 10 अपडेट लॉन्च, बदलणार 'हे' फिचर्स
या स्मार्टफोनसाठी आलेल्या या नव्या अपडेटमुळे फिचर्ससह अन्य काही गोष्टी बदलणार आहेत. अॅन्ड्राइड 10 या नव्या अपडेटमध्ये उत्तम प्रायव्हेसी, परफॉर्मन्स मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. लवकरच सॉफ्टवेअरसाठी अपडेट सुद्धा देण्यात येणार आहे.
अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनसाठी लेटेस्ट आणि दमदार व्हर्जन Android 10 लॉन्च करण्यात आले आहे. या स्मार्टफोनसाठी आलेल्या या नव्या अपडेटमुळे फिचर्ससह अन्य काही गोष्टी बदलणार आहेत. अॅन्ड्राइड 10 या नव्या अपडेटमध्ये उत्तम प्रायव्हेसी, परफॉर्मन्स मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. लवकरच सॉफ्टवेअरसाठी अपडेट सुद्धा देण्यात येणार आहे.
सध्या नव अपडेट Android 10 Google Pixel 3a, Pixel 3a XL, Pixel 3, Pixel 3 XL, Pixel 2, Pixel 2 XL आणि Pixel, Pixel XL जनरेशनसाठी लॉन्च करण्यात आले आहे. तसेच स्मार्टफोन अपडेट केल्यावर युजर्सला Dark Mode ची सुविधा देण्यात आली आहे. तसेच लोकेशन संबधित फिचरमध्ये बदलाव करण्यात आला असून लोकेशन ऑन-ऑफ करण्यासह अन्य तिसरे ऑप्शन सुद्धा दिले आहे.(Chrome Browser वरुन गुगल काही फिचर्स हटवण्याच्या तयारीत, हे आहे कारण)
तसेच OS च्या लेटेस्ट व्हर्जन Android 10 आल्यानंतर पासवर्ड शिवाय Wifi कनेक्ट करता येणार आहे. त्यामुळे युजर्सला प्रत्येकवेळी पासवर्ड टाकण्याचा त्रास होणार नाही. मात्र फक्त एका QR कोडच्या माध्यमातून वायफायला कनेक्ट करता येणार आहे. नव्या अपडेटमुळे अॅप काही सेकंदात सुरु होणार, कमी मेमोरी लागणार असल्याचे गुगलने सांगितले आहे. अॅन्ड्रॉइड 10 अपडेट देशातील सर्व गुगल पिक्सलच्या स्मार्टफोनसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.