अॅमेझॉन प्राईम नाऊ युजर्ससाठी खास ऑफर ; स्विट्स, चॉकलेट्सची दोन तासात मिळेल डिलिव्हरी
अॅमेझॉनच्या नव्या ऑफरअंतर्गत मिठाई, चॉकलेट्सची डिलिव्हरी दोन तासात मिळेल.
ई कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनने (amazon) आपल्या प्राईम युजर्ससाठी खास ऑफर सुरु केली आहे. या ऑफर अंतर्गत युजर्सला मिठाई, चॉकलेट्सची डिलिव्हरी दोन तासात मिळेल. ही सुविधा सध्या बंगळूरु, दिल्ली, हैद्राबाद आणि मुंबईत सुरु करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी युजर्स अॅमेझॉनवर सकाळी 6 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत ऑर्डर करु शकतात. त्यानंतर युजर्सला मिठाई आणि चॉकलेट्सची डिलिव्हरी दोन तासात मिळेल.
मिठाई आणि चॉकलेट्सच्या डिलिव्हरीसाठी अॅमेझॉनने (amazon) या शहरातील काही दुकानांशी टायअप केले आहे. ही दुकाने युजर्सला त्यांच्या ऑर्डरची डिलिव्हरी करतील. अॅमेझॉन प्राईम नाऊचे मालक सिद्धार्थ नाम्बियार यांनी सांगितले की, "आम्हाला खूप आनंद आहे की, या फेस्टिव सीजनमध्ये प्राईम नाऊ सिलेक्शनमध्ये 10,000 हून अधिक ग्राहकांनी इलेक्ट्रॉनिक, होम, किचन आणि ग्रॉसरीशिवाय मिठाई आणि चॉकलेट्स देखील ऑर्डर केले. या ऑर्डरची डिलिव्हरी दोन तासात मिळेल."
बंगळूरुमध्ये एडिगास, नंदीनी आणि लाल स्वीट्स तर हैद्राबादमध्ये एलमंड हाऊस, काराची बेकरी, मुंबईत घसीटराम तर दिल्लीत बिकानो, लाल स्वीट्स येथून डिलिव्हरी केली जाईल.
प्राईम नाऊ युजर्ससाठी शॉपिंगचा हा वेगळा अनुभव देण्याची अॅमेझॉन इंडियाचा मानस आहे. यासाठी कंपनी आपले डिलिव्हरी नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच कंपनीने प्राईन नाऊ ग्राहकांसाठी देशभरात फुलफिलमेंट सेंटर्स उभारले आहेत.