Amazon Prime Day Sale 2020 ला उद्यापासून सुरुवात; स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही आणि इतर इलेक्ट्रोनिक्स प्रॉडक्ट्सवर आकर्षक ऑफर्स

परंतु, यंदाच्या कोरोना व्हायरस संकटात हा सेल उद्यापासून सुरु होणार आहे. 6-7 ऑगस्ट असा दोन दिवस अॅमेझॉन प्राईम डे सेल आयोजित करण्यात आला आहे.

Amazon Prime Day Sale 2020 (Photo Credits: Amazon India)

ई-कॉमर्स साईट अॅमेझॉनवर दोन दिवसांचा सेल जुलै मध्ये आयोजित केला जातो. परंतु, यंदाच्या कोरोना व्हायरस संकटात या सेल उद्यापासून सुरु होणार आहे. 6-7 ऑगस्ट असा दोन दिवस अॅमेझॉन प्राईम डे सेल आयोजित करण्यात आला आहे. केवळ अॅमेझॉन प्राईम मेंबर्स या सेलचा लाभ घेऊ शकतात, हा सेल अंतर्गत टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टफोन, गेमिंग कन्सोल आणि इतर इलेक्ट्रोनिक्स डिव्हाईसेसवर विविध प्रकारचे डिस्काऊंट्स आणि डिल्स उपलब्ध आहेत.

सेलला सुरुवात होण्यापूर्वी येणाऱ्या नवीन स्मार्टफोन्सवर अॅमेझॉनने वेगवेगळ्या ऑफर्स सादर केल्या आहेत. अॅमेझॉन वेबसाईटनुसार, बजेट स्मार्टफोन्सवर 40% पर्यंत डिस्काऊंट देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयचा देखील ऑप्शन दिला जाणार आहे. सॅमसंग गॅलेक्स एम31एस, वनप्लस नॉर्ड, रेडमी 9 प्राईम यांसारखे स्मार्टफोन्स प्राईम डे सेल 2020 चे आकर्षण ठरले आहेत.

Amazon India Tweet:

या सेलमध्ये गॅलेक्सी एम11, गॅलेक्सी एम21, ओप्पो ए5 2020 आणि रेडमी नोट 8 यांसारख्या बजेट स्मार्टफोन्सवर देखील डिस्कासऊंट्स मिळणार आहेत. त्याचप्रमाणे आयफोन 11 वनप्लस 7टी, वनप्लस 8 आणि गॅलेक्सी एम 31 यांसारख्या हाय रेंज स्मार्टफोन्सवर bundled offers दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे विवो व्ही 17, विवो व्ही 19, ओप्पो ए52, गॅलेक्सी ए31, विवो एस1 प्रो आणि ओपो एफ15 यांसारख्या मीड रेंज फोन्सवर सूट आणि ऑफर्स सादर करण्यात आल्या आहेत.

Samsung Galaxy M31s Launched in India (Photo Credits: Samsung India)
OnePlus TV U Series & OnePlus TV Y Series Launched in India (Photo Credits: OnePlus India)

अॅमेझॉन प्राईम डे सेल 2020 मध्ये वनप्लस स्मार्ट टीव्ही वर विविध ऑफर्स पाहायला मिळतील. एचएसबीसी कॅशबॅक कार्ड किंवा आयसीसीआय बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास 5% पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. त्याचप्रमाणे काही ठरावित कार्ड्सवर नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील देण्यात आला आहे. सोनी, एलजी, एमआय आणि ओनिडा या ब्रँड्सच्या स्मार्ट टीव्हीवर देखील आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

Echo Show 5

याशिवाय इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर देखील ग्राहकांना डिस्काऊंट मिळणार आहे. यामध्ये अॅमेझॉन फायर टीव्ही स्टिक, अॅमेझॉन एको यांचा समावेश आहे. त्याचबरोबर काही स्मार्टव्हॉचेसवर 60% पर्यंत डिस्काऊंट तर काही ब्रँडेड लॅपटॉपवर 30 हजार रुपयांचा डिस्काऊंट दिला जाणार आहे.