Amazon Prime Day Sale 2020: भारतात 6 ऑगस्टपासून होणार 'अॅमेझॉन प्राईम डे सेल'ला सुरुवात; 'या' आहेत आकर्षक ऑफर्स
ऑगस्ट मध्ये सेल आयोजित करण्याची अॅमेझॉनची ही पहिलीच वेळ आहे.
ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने (Amazon) प्राईम डे अॅन्युल सेल (Prime Day Annual Sale) ऑगस्ट 6-7 रोजी आयोजित केला आहे. ऑगस्ट मध्ये सेल आयोजित करण्याची अॅमेझॉनची ही पहिलीच वेळ आहे. गेल्यावर्षी हा सेल जुलैच्या मध्यात आयोजित केला होता. मात्र यंदा कोविड-19 (Covid-19) संकटामुळे सेल ऑगस्टमध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा सेल 6 ऑगस्टच्या मध्य रात्रीपासून सुरु होणार असून 7 ऑगस्टपर्यंत तुम्ही या सेलचा लाभ घेऊ शकता. या सेल अंतर्गत स्मार्टफोन, इलेक्ट्रोनिक्स, टीव्ही, किचन, खेळणी, ब्युटी प्रॉडक्ट्स, फॅशन या सर्व गोष्टींवर ऑफर्स मिळणार आहेत. तसंच 300 हून अधिक नवीन प्रॉडक्ट्सवर सूट देण्यात येणार आहे. यात सॅमसंग, वनप्लस, मायक्रोसॉफ्ट, शाओमी, टायटन, Xbox, Jabra, इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे.
खरेदी केलेल्या वस्तूंचे पेमेंट अॅमेझॉन पे द्वारे केल्यास ग्राहकांना 2000 रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. त्याचबरोबर प्राईम मेंबर्संना 23 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान खरेदी केल्यास 20% कॅशबॅक मिळणार असून याची मर्यादा 200 रुपये इतकी असेल.
Amazon India Tweet:
तसंच वेगवेगळ्या स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स आणि इतर गॅजेट्सवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. तसंच 10% डिस्काऊंट, नो-कॉस्ट ईएमआय या पर्यायांसह एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन खरेदी केल्यास ग्राहकांना एक्सचेंज ऑफर्स देखील दिली जात आहे. तसंच सेलच्या दिवशी प्राईम सब्सक्रायबर्सच्या मनोरंजनासाठी अॅमेझॉन प्राईमवर नवे सिनेमे देखील अॅड करण्यात येतील.
यावर्षी युजर्संना Birds of Prey', 'शकुंतला देवी', 'Gemini Man' आणि Bandish Bandits यांसारखे सिनेमे पाहता येतील. अॅमेझॉन प्राईम डे सेल 2020 चा लाभ घेण्यासाठी अॅमेझॉन प्राईम मेंबरशीप असणे अनिवार्य आहे. अॅमेझॉन प्राईम मेंबरशीप वर्षाला 999 रुपये तर महिन्याला 129 रुपये इतकी आहे.