Airtel ने 30 दिवसांच्या वैधतेसह, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह लाँच केले 296 आणि 319 रुपयांचे प्रीपेड प्लॅन, जाणून घ्या सविस्तर

एक पूर्ण महिना वैधता देणाऱ्या योजनेमुळे वापरकर्त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळेल.

Airtel posters. (Photo Credit: PTI)

Airtel New Prepaid Plans: एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या यादीत आणखी दोन योजना जोडल्या आहेत. कंपनीने 296 आणि 319 रुपयांचे प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. एअरटेलचा 296 रुपयांचा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि कंपनीचा 319 रुपयांचा प्लॅन पूर्ण एका महिन्याच्या वैधतेसह येतो. काही महिन्यांपूर्वी, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने दूरसंचार कंपन्यांना किमान एक प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह आणण्याचे निर्देश दिले होते. एक पूर्ण महिना वैधता देणाऱ्या योजनेमुळे वापरकर्त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळेल. या सूचनांचे पालन करून, एअरटेलने या दोन नवीन योजना आपल्या प्रीपेड प्लॅन पोर्टफोलिओमध्ये जोडल्या आहेत.

एअरटेलचा 319 रुपयांचा प्रीपेड प्लॅन -

एअरटेलचा 319 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 30 दिवसांसाठी दररोज 2GB डेटासह येतो. याचा अर्थ असा की, या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला एका महिन्यात एकूण 60GB डेटा मिळेल, जो सरासरी वापरकर्त्यासाठी पुरेसा आहे. याशिवाय हा प्लान अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएससह येतो. या व्यतिरिक्त, प्लॅनमध्ये एअरटेल थँक्स फायदे जसे की विंक म्युझिक, शो अकादमी, अपोलो 24|7 सर्कल आणि बरेच काही समाविष्ट आहे. (हेही वाचा -Jio Calendar Month Validity Plan: जिओने लाँच केला 259 रुपयांचा ‘कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी’ प्रीपेड प्लॅन; ग्राहकांना मिळणार 'हे' फायदे)

296 रुपयांचा प्रीपेड प्लॅन -

टेलिकॉम कंपनीच्या वेबसाइटवर सूचीबद्ध केलेल्या 296 रुपयांच्या एअरटेल प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, 100 एसएमएस आणि एकूण 25 जीबी इंटरनेट डेटा मिळतो. या प्लॅनची ​​वैधता 30 दिवसांची आहे.

जानेवारीमध्ये ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना अशा योजना आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. या आठवड्याच्या सुरुवातीला, रिलायन्स जिओने 259 रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील लॉन्च केला आहे, ज्याला कंपनीने कॅलेंडर प्लान असं नाव दिलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif