Airtel चा स्मार्ट रिचार्ज प्लॅन; पाहा काय आहे खासियत

एअरटेलने आपल्या युजर्ससाठी सर्वात छोटा रिचार्ज पॅक सीरीजमध्ये अजून एक नवा स्मार्ट रिचार्ज पॅक लॉन्च केला आहे.

एअरटेल (File Photo)

एअरटेलने (Airtel) आपल्या युजर्ससाठी सर्वात छोटा रिचार्ज पॅक (Small Smart Recharge Plan) सीरीजमध्ये अजून एक नवा स्मार्ट रिचार्ज पॅक लॉन्च केला आहे. एअरटेलप्रमाणे  वोडाफोन आयडिआने (Vodafone Idea) देखील युजर्ससाठी अलिकडेच एक रिचार्ज पॅक आणला होता. तर पाहुया काय आहे एअरटेलच्या या स्मार्ट प्लॅनची खासियत... रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन: कुणाचा डेटा पॅक अधिक स्वस्त? घ्या जाणून

एअरटेलचा 23 रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या या खास प्लॅनमध्ये युजर्सला सर्व लोकल आणि एसटीडी कॉल्ससाठी 2.5 पैसे प्रती सेकंद खर्च करावे लागतील. त्याचबरोबर एसएमएससाठी 1 रुपया आणि एसटीडीसाठी 1.5 रुपये द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये युजर्सला कॉलिंग आणि डेटाचा लाभ घेण्यासाठी वेगळे टॉप अप रिचार्ज करावे लागेल.

एअरटेलचा 35 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनशिवाय भारती एअरटेलचा अजून एक 35 रुपयांचा रिचार्ज प्लॅन बाजारात उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला 26.66 रुपयांचा बॅलन्स 28 दिवसांसाठी मिळेल. त्याचबरोबर 100 एमबी डेटा देखील उपलब्ध होईल.

वोडाफोन आयडिया 35 रुपयांचा प्लॅन

एअरटेल प्रमाणे वोडाफोन आयडियाने देखील अशाप्रकारचा प्लॅन लॉन्च केला होता. याची व्हॅलिडीटी 28 दिवसांची होती. या प्लॅनमध्ये युजर्सला 26.66 रुपयांचा बॅलन्स मिळत असून 100 एमबी डेटा देखील मिळत आहे. मात्र यात तुम्हाला फ्री एसएमएसची सुविधा मिळणार नाही.

एअरटेलने यापूर्वी 23 रुपयांचा रिचार्ज प्लॅन लॉन्च केला होता. यात युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि 200 एमबी डेटा मिळत होता. या प्लॅनची व्हॅलिडिटी 9 दिवसांची होती.



संबंधित बातम्या

New Mahabaleshwar: नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा विकास आराखडा प्रसिद्ध; ट्रेकिंग, वॉटर स्पोर्ट्स, टॉय ट्रेन्स, केबल सिस्टिमसह अनेक बाबींचा समावेश, जाणून घ्या सविस्तर

Reliance Jio New Rs 999 Prepaid Plan: रिलायन्स जिओ नवा प्रीपेड प्लॅन, 98 दिवसांची वैधता आणि अमर्यादित 5G डेटा; मुकेश अंबानी यांचा दूरसंचार कंपन्यांना धक्का

Airtel Digital TV Partners with Amazon Prime: एअरटेल डिजिटल टीव्हीची ॲमेझॉन प्राइमसोबत भागीदारी; मिळणार लाइव्ह टी.व्ही आणि प्राइम लाइट फायदे, जाणून घ्या प्लॅन्सच्या किंमती

Who Will Replace Arvind Kejriwal: दिल्‍लीच्‍या मुख्‍यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार? सौरभ भारद्वाज, राघव चढ्ढा, कैलाश गहलोत, संजय सिंग या नेत्‍यांची नावे चर्चेत