AI Robot Girlfriend 'Aria': पुरुषांच्या 'एकाकीपणा'च्या समस्येवर उपाय; बाजारात आली एआय रोबोट गर्लफ्रेंड, जाणून घ्या वैशिष्ट्ये व किंमत (Video)

अमेरिकन टेक कंपनी रियलबॉटिक्सने (Realbotics) एआय रोबोट गर्लफ्रेंड तयार केली आहे, तिचे नाव आरिया (Aria) आहे. आरिया माणसाप्रमाणे बोलू शकते आणि तिच्या भावना तुमच्याशी शेअर करू शकते.

AI Robot Girlfriend 'Aria'

AI Robot Girlfriend: जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) वेगाने विस्तारत आहे. एआयच्या मदतीने आता अनेक कामे सुलभ झाली आहेत. अशात एआय रोबो (AI Robots) चर्चेत आहे, कारण हे रोबो माणसांपेक्षा कमी नाहीत. एआय रोबोट तुमच्या भावना समजू शकतात आणि तुमच्या भावनांचा आदरही करू शकतात. आता अमेरिकन टेक कंपनी रियलबॉटिक्सने (Realbotics) एआय रोबोट गर्लफ्रेंड तयार केली आहे, तिचे नाव आरिया (Aria) आहे. आरिया माणसाप्रमाणे बोलू शकते आणि तिच्या भावना तुमच्याशी शेअर करू शकते. आरिया एका विश्वासू साथीदाराप्रमाणे नेहमीच तुमच्यासोबत असेल असा कंपनीचा दावा आहे. लास वेगासमधील 2025 कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) मध्ये हा रोबोट प्रदर्शित करण्यात आला होता.

आरियाची वैशिष्ट्ये-

आरियाची रचना वास्तविक माणसांसारखा अनुभव देण्यासाठी करण्यात आली आहे. हे केवळ तुमच्या चेहऱ्यावरील हावभावांची नक्कलच नाही तर, मानवासारखी प्रतिक्रिया देखील देऊ शकते. एवढेच नाही तर मानव आपल्या इच्छेनुसार या रोबोचे स्वरूप देखील बदलू शकतो. हे वैयक्तिकृत अनुभव प्रदान करते.

किंमत-

माहितीनुसार, आरियाची किंमत $175,000 (सुमारे 1.5 कोटी रुपये) ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे ते लक्झरी तंत्रज्ञान उत्पादन बनते. मात्र, कंपनीने हा रोबो तीन व्हर्जनमध्ये सादर केला आहे. यामध्ये बस्ट मॉडेलचा समावेश आहे ज्याची किंमत $10,000 आहे, मॉड्यूलर आवृत्ती ज्याची किंमत $150,000 आहे आणि रोलिंग बेस असलेले स्टँडिंग मॉडेल आहे ज्याची किंमत $175,000 आहे. (हेही वाचा: Tiny Robot Kidnaps 12 Big Bots: काय सांगता? चीनमध्ये एका छोट्या रोबोटने केले 12 मोठ्या रोबोंचे 'अपहरण'; व्हिडिओ व्हायरल)

एआय रोबोट गर्लफ्रेंड-

सोशल मीडिया आणि चर्चा-

रियलबॉटिक्सचे सीईओ अँड्र्यू किगुएल म्हणाले की, मानवांसारखाच दिसेल आणि वागू शकेल असे रोबोट्स तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. आरियाचा व्हिडिओ शेअर करताना, एका सोशल मीडिया वापरकर्त्याने तिला ‘महिला रोबोट साथीदार’ म्हटले आहे. यासोबतच आरियाच्या किमतीवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींचे म्हणणे आहे की, दीड कोटी रुपयांमध्ये एक आलिशान फ्लॅट येईल, तर काहींचे म्हणणे आहे की ती खऱ्या गर्लफ्रेंड तरी कमीच महाग आहे.

दरम्यान, आरिया ही केवळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांतीच नाही, तर मानव आणि रोबोट यांच्यातील कनेक्टिव्हिटीचे नवे उदाहरणही सादर करते. याशिवाय हा रोबोट समाजातील वाढत्या ‘पुरुषांच्या एकाकीपणाच्या समस्येवर’ उपायही प्रदान करू शकतो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now