AI Impact On Humanity Survey: आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मानवता नष्ट करण्याचा धोका, CEO Summit सीईओंचा दावा
एका सर्व्हेक्षणानुसार 119 पैकी 42% कंपनीच्या प्रमुख पदांवर काम करणाऱ्या मंडळींना वाटते की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये पुढील 5-10 वर्षांमध्ये मानवतेला नष्ट करण्याची क्षमता आहे. ज्यामुळे मानवी सभ्यताच धोक्यात (AI Impact On Humanity) येऊ शकते.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) अर्थाच कृत्रिम बुद्धमत्ता हा सध्या सर्वत्र चर्चिला जाणारा विषय आहे. जगभरामध्ये त्याबाबत अभ्यास, संशोधन आणि सर्व्हेक्षणही सुरु आहे. त्याचे निष्कर्ष आणि परिणाम वेगवेगळे आहेत. दरम्यान, येल सीईओ समिटनेसुद्धा याबाबत नुकतेच एक सर्व्हेक्षण केले. त्यात असे आढळून आले आहे की, 119 पैकी 42% कंपनीच्या प्रमुख पदांवर काम करणाऱ्या मंडळींना वाटते की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये पुढील 5-10 वर्षांमध्ये मानवतेला नष्ट करण्याची क्षमता आहे. ज्यामुळे मानवी सभ्यताच धोक्यात (AI Impact On Humanity) येऊ शकते.
सीईओ समिट अभ्यासामध्ये असेही म्हटले आहे की, एआय सध्या निर्मितीच्या टप्प्यावर उभी आहे. जी पुढच्या काहीच काळात पूर्णपणाने विकसीत होईल आणि त्यातील नवनवी अद्यातने पुढे येत राहतील. दरम्यान, अभ्यासादरम्यान, एआयमुळे मानवी सभ्यतेला धोका निर्माण होऊ शकतो का, असे सर्वेक्षणात विचारण्यात आले. त्याच्या उत्तरात 58% लोकांनी म्हटले आहे की, AI मुळे धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान, कोका-कोला, वॉलमार्ट आणि झेरॉक्स सारख्या कंपन्यांच्या सीईओंनी मात्र, आपल्या मुलाखतीदरम्यान, एआयचे फायदे आणि काही तोटेही असल्याचे सांगत संमिश्र भूमिका व्यक्त केली. (हेही वाचा, Gmail ‘Help Me Write’ फीचर आता Android, iOS वर उपलब्ध, पण कोणासाठी? घ्या जाणून)
ओपनएआयचे सीईओ, सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांनी म्हटले आहे की, आज एआयबद्दल अनेक लोक वेगवेगळी मते व्यक्त करत आहेत. काहींना वाटते एआयमुळे नोकऱ्या धोक्यात येतील. पण, त्याची दुसरीही बाजू आहे. एआयमुळे नोकरीच्या नव्या संधीही निर्माण होतील. होत आहेत.
दरम्यान, जगभरामध्ये एआयबद्दल साधकबाधक चर्चा सुरु असतानाच इलॉन मस्क, स्टीफन हॉकिंग आणि बिल गेट्स सारख्या उच्च-प्रोफाइल व्यक्तींनी AI च्या संभाव्य धोक्यांचा इशारा आगोदरच दिला आहे. शिवाय त्यांनी एआयमुळे मानवतेसाठी सर्वात मोठे अस्तित्व धोक्याचे असू शकते आणि तिसरे महायुद्ध होऊ शकते, असेही म्हटले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)