AI Can Crack Password! आर्टिफिशियल इंटेलिजन्स करू शकतो तुमचा पासवर्ड क्रॅक; जाणून घ्या डिव्हाइस आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल

अगदी 10-अंकी फक्त-संख्यात्मक पासवर्ड देखील सहजपणे हॅक केला जाऊ शकतो.

Artificial Intelligence (File Image)

गेल्या काही महिन्यांत एआयचा (Artificial Intelligence) वापर झपाट्याने वाढला आहे. चॅटजीपीटी आणि इतर एआय टूल्सचा सतत वापर सायबर सुरक्षेसाठी (Cyber Security) धोकादायक ठरत आहे. स्कॅमर एआय टूल्सचा वापर करून लोकांना त्यांचे लक्ष्य बनवत आहेत. अलिकडच्या वर्षांत, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ने सायबर सुरक्षा क्षेत्रातही प्रवेश केला आहे. एआयद्वारे पासवर्ड-क्रॅक टूल्स वेगाने उदयास येत आहेत. विकसकांनी अशी साधने तयार केली आहेत, जी काही मिनिटांत नव्हे तर काही सेकंदात जटिल पासवर्ड क्रॅक करू शकतात.

जर एआयने पासवर्ड क्रॅक केला तर ही बाब वैयक्तिक तसेच कॉर्पोरेट डेटाला धोका निर्माण करेल. आजच्या जगात ‘माहिती’ म्हणजेच डेटा ही एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. त्यामुळे पासवर्डद्वारे ही माहिती सुरक्षित राहणे महत्वाचे आहे. होम सिक्युरिटी हिरोजच्या अभ्यासानुसार, सर्व सामान्य पासवर्डपैकी सुमारे 51% एआयद्वारे एका मिनिटापेक्षा कमी वेळात क्रॅक केले जाऊ शकतात. शिवाय, 65% सामान्य पासवर्ड एका तासापेक्षा कमी वेळेत क्रॅक झाले, तर 81% ला एका महिन्यापेक्षा कमी वेळ लागला.

एका सिक्युरिटी रिसर्च फर्मच्या मते, क्रॅक करण्यासाठी सर्वात सोपा पासवर्ड म्हणजे फक्त संख्या असलेले पासवर्ड. अगदी 10-अंकी फक्त-संख्यात्मक पासवर्ड देखील सहजपणे हॅक केला जाऊ शकतो. फक्त लोअरकेस अक्षरे असलेला दहा-वर्णांचा पासवर्ड क्रॅक होण्यासाठी एक तास लागतो, तर दहा-वर्णांच्या मिश्र-केस पासवर्डला चार आठवडे लागतात. अभ्यासानुसार, 18 पेक्षा जास्त अक्षरे असलेले पासवर्ड साधारणपणे एआय पासवर्ड क्रॅकर्सद्वारे क्रॅक होऊ शकत नाहीत. यासह चिन्हे, संख्या, लहान अक्षरे आणि कॅपिटल अक्षरे असलेला पासवर्ड क्रॅक करण्यासाठी 6 क्विंटिलियन वर्षे लागू शकतात, असेही या अभ्यासातून समोर आले आहे. (हेही वाचा: 6G Internet Services In India: भारतात लॉन्च होणार 6G; बुलेटपेक्षाही वेगवान असेल इंटरनेटचा स्पीड, जाणून घ्या कधी सुरू होणार सेवा)

जाणून घ्या कोणता पासवर्ड हॅक करणे ठरू शकते अवघड-

होम सिक्युरिटी हिरोजनुसार, किमान 15 वर्णांचा पासवर्ड तयार करा. या 15 वर्णांच्या पासवर्डमध्ये कमीत कमी दोन अक्षरे अप्पर आणि लोअर केस असणे आवश्यक आहे. पासवर्डमध्ये संख्या आणि चिन्हे वापरणे देखील आवश्यक आहे. सुरक्षित राहण्यासाठी, सामान्य आणि अंदाज लावायला सोपेर असणारे पासवर्ड टाळा, विशेषत: फक्त संख्या असलेले सुरक्षित राहण्यासाठी, अंदाज लावणे सोपे आणि सामान्य पासवर्ड टाळा, विशेषत: फक्त संख्या असलेले पासवर्ड.